Photo Credit: Infinix
Infinix Note 50 मालिका एप्रिल 2024 मध्ये आलेल्या नोट 40 (चित्र) लाइनअपला यशस्वी करेल
Infinix Note 50 series पुढील महिन्यामध्ये लॉन्च होणार आहे. हा स्मार्टफोन Infinix Note 40 च्या पुढील फोन आहे. हा फोन वर्षभरापूर्वी आला होता. पहिल्यांदा हा फोन इंडोनेशिया मध्ये येणार आहे.
कंपनीने जारी केलेल्या टीझरमध्ये Infinix Note 50 मालिकेतील एका हँडसेटच्या मागील कॅमेरा मॉड्युल दिसत आहे. आगामी नोट 50 सीरीज मध्ये एआयचा देखील समावेश आहे.
Infinix Note 50 series स्मार्टफोन इंडोनेशिया मध्ये 3 मार्च दिवशी लॉन्च होणार आहे. याबाबत इंस्टावर पोस्ट केली आहे. कंपनीने यापूर्वी एका पोस्ट द्वारा पहिली झलक दाखवली आहे. अद्याप Infinix
कडून नोट 50 सीरीज मध्ये किती मॉडेल्स असतील याची माहिती देण्यात आली नसल्याचं म्हटलं आहे.
कंपनीच्या पोस्ट नुसार, Infinix Note 50 series मध्ये AI सपोर्ट आहे. फोनच्या एखाद्या मॉडेल मध्ये rear camera module असण्याचा अंदाज आहे. या फोनचे अधिक तपशील येत्या काही दिवसामध्ये जारी केले जाण्याचा अंदाज आहे.
Infinix चा Infinix Note 50 Pro हा स्मार्टफोन यापूर्वी इंडोनेशियाच्या SDPPI website,वर model number X6855 म्हणून लिस्ट झाला आहे. रेग्युलेटरच्या वेबसाइटवरील लिस्टिंग त्याच्या कोणत्याही फीचरची माहिती देत नाही, परंतु आगामी मालिकेतील किमान एक मॉडेलची पुष्टी करते असे दिसते.
Infinix Note 50 Pro एप्रिल 2024 मध्ये आलेल्या Note 40 Pro 5G मॉडेलचा उत्तराधिकारी म्हणून येण्याची अपेक्षा आहे. त्या हँडसेटमध्ये 6nm MediaTek Dimensity 7020 चिप आणि 5,000mAh बॅटरी आहे. यात 120Hz रिफ्रेश रेटसह 6.78-curved 3D AMOLED display आहे. Note 40 Pro मध्ये 108-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देखील आहे.
Infinix Note 50 भारतामध्ये कधी लॉन्च होणार? याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही परंतू यावर्षामध्ये हा फोन भारतात येऊ शकतो. जेव्हा Note 40 Pro+ 5G भारतामध्ये आला होता तेव्हा त्याची किंमत 24,999 होती आणि Note 40 5G ची किंमत 19,999 होती असं सांगण्यात आले आहे.
जाहिरात
जाहिरात