Infinix Smart 10 सह 5000mAh बॅटरी, 8MP कॅमेरा; पहा दमदार फीचर्स

Infinix Smart 10 हा स्मार्टफोन octa-core Unisoc T7250 SoC वर चालणार आहे. तो 4GB of LPDDR4x RAM आणि 64GB of onboard storage सोबत जोडला आहे.

Infinix Smart 10 सह 5000mAh बॅटरी, 8MP कॅमेरा; पहा दमदार फीचर्स

Photo Credit: Infinix

इन्फिनिक्स स्मार्ट १० ला धूळ आणि स्प्लॅश प्रतिरोधकतेसाठी IP64 रेटिंग आहे

महत्वाचे मुद्दे
  • Infinix Smart 10 मध्ये 8MP Primary Camera आहे, मागील बाजूस depth sensor
  • Infinix Smart 10 ची किंमत 6799 रूपयांपासून सुरू होणार आहे, हा 4GB + 64GB
  • Infinix Smart 10 मध्ये Android 15-based XOS 15.1 चा समावेश असणार आहे
जाहिरात

Infinix कडून नवा फोन दहा हजारांच्या रेंज मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या फोनमध्ये HD+ display, 5,000mAh battery, IP64 water resistance, 3.5mm headphone jack, NFC आणि FM radio support आहे. Infinix Smart 10 मध्ये 5,000mAh बॅटरी आहे जी 15 वॅट वायर्ड फास्ट चार्जिंग आणि रिव्हर्स वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. हा नवा फोन बाजारात Vivo T4 Lite, Poco M7 आणि Lava Storm Play ला टक्कर देणार आहे. मग पहा Infinix Smart 10 ची फीचर्स, स्पेसिफिकेशन्स काय? किंमत काय?Infinix Smart 10 ची पहा स्पेसिफिकेशन्स,Infinix Smart 10 मध्ये 6.67-inch HD+ LCD display, 120Hz refresh rate आणि 700 nits of peak brightness आहे. या फोनमध्ये IP64 रेटिंग असल्याने फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहणार आहे. पाण्याच्या स्प्लॅश पासून हा फोन सुरक्षित असेल पण पाण्यात तो बुडवला जाऊ शकत नाही.

Infinix Smart 10 मध्ये ड्युअल स्पीकरचा समावेश आहे. तो DTS द्वारे ट्यून केलेला ड्युअल-स्पीकर सेटअप आहे जो 300% पर्यंत व्हॉल्यूम बूस्टला सपोर्ट करतो. Smart 10 मध्ये Unisoc T7250 processor आणि A55 GPU आहे. 4GB LPDDR4x RAM आणि 64GB स्टोरेज आहे, जे मायक्रोएसडी कार्ड स्लॉटद्वारे 2TB पर्यंत वाढवता येते. हे Android 15 वर आधारित कंपनीच्या नव्या XOS 15 वर चालते आणि Infinix च्या AI फीचर्सला समर्थन देते. Infinix फोनसाठी विशिष्ट अपडेट सायकलचे आश्वासन देत नसले तरी, ते नमूद करते की ते चार वर्षांच्या लॅग-फ्री अनुभवासाठी TÜV SÜD प्रमाणपत्र घेते.

फोनमधील कॅमेरा पाहता, Smart 10 मध्ये 8MP primary camera आहे. मागील बाजूस depth sensor आहे, तर समोर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 8MP कॅमेरा आहे. पुढील आणि मागील दोन्ही कॅमेरे 2K 30fps पर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतात.

Infinix Smart 10 मध्ये 5,000mAh बॅटरी आहे जी 15 वॅट वायर्ड फास्ट चार्जिंग आणि रिव्हर्स वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. Infinix च्या Folax AI व्हॉइस असिस्टंट सारख्या एआय फीचर्सना समर्थन देते. फोनमध्ये अल्ट्रालिंक फीचर्स देखील आहे, जे सेल्युलर नेटवर्कशिवाय देखील कॉल करण्याची परवानगी देते.

Infinix Smart 10 ची भारतामधील किंमत काय?

Infinix Smart 10 भारतामध्ये 6799 रूपयांमध्ये विकत घेता येणार आहे. हा फोन 4GB + 64GB पर्यायासह आहे. तर Infinix Smart 10 हा Iris Blue, Sleek Black, Titanium Silver, आणि Twilight Gold रंगांमध्ये उपलब्ध आ हे. भारता मध्ये हा फोन Flipkart च्या माध्यमातून खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. ऑफलाईन रिटेल स्टोअर्स मध्ये त्याची विक्री 2 ऑगस्ट पासून सुरू होत आहे.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Samsung कडून One UI 8 अपडेटमध्ये कस्टम ROM चा मार्ग बंद होणार असल्याची चर्चा; पहा अपडेट
  2. Oppo Reno 14FS 5G AMOLED Display, 50MP Camera सह प्रिमियम फीचर्स; पहा अपडेट्स
  3. Realme 15 सीरिज लॉन्च; AI फीचर्स, 80W चार्जिंग सह पहा फीचर्स
  4. Infinix Smart 10 सह 5000mAh बॅटरी, 8MP कॅमेरा; पहा दमदार फीचर्स
  5. कर्व्ह डिस्प्ले, 50MP कॅमेरा, 6720mAh बॅटरी सह येणार मोटोरोला चा नवा स्मार्टफोन Moto G86 Power 5G
  6. itel चा सुपर गुरु 4G Max फोन झाला लॉन्च; 13 भाषांमध्ये मिळणार सपोर्ट
  7. Lava Blaze Dragon लवकरच बाजरात येणार नवा 5G फोन दहा हजार पेक्षा कमी किंमतीमध्ये मिळणार
  8. Redmi कडून दोन नवीन फोन लाँच करत 11 व्या वर्षपूर्तीचं स्पेशल सेलिब्रेशन
  9. Asus Vivobook 14 Copilot+ PC भारतात लॉन्च; किंमत 65,990 पासून सुरू
  10. Vodafone Idea चे प्रीपेड युजर्सना दिली खुशखबर; पहा काय खास
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »