टिंटेड मोड मजकूर आणि इंटरफेस घटक वाचण्यास सोपे करण्यासाठी अपारदर्शकता आणि कॉन्ट्रास्ट किंचित वाढवतो.
Photo Credit: Apple
आयफोन १७ सिरीज आयओएस २६ सह आउट ऑफ द बॉक्स लाँच करण्यात आली.
अॅपल कडून चौथे beta of iOS 26.1 जारी करण्यात आले आहे. या नव्या अपडेट मध्ये काही नवीन पर्यांयांचा समावेश आहे. ज्यात आता लिक्विड ग्लास डिझाईन इंटरफेस मध्ये वाचकांना रिडॅबिलिटी सुधारता येणार आहे. आणि लॉक स्क्रीनवरून कॅमेरा चुकून सुरू होण्यापासून रोखण्यासाठी टॉगल समाविष्ट आहे. iOS 26 public beta 4 मध्ये पहा काय आहे नवीन?iOS 26.1 public beta 4 मध्ये नेमका कशाचा समावेश,Liquid Glass toggle.Apple ने एक नवीन सेटिंग सादर केली आहे जी यूजर्सना Liquid Glass interface ची पारदर्शकता पातळी अॅडजस्ट करण्यास मदत करते. यासाठी Settings > Display and Brightness पर्यायावर क्लिअर आणि टिंटेड मोडमध्ये स्विच करण्याची परवानगी मिळणार आहे.
Clear mode मध्ये पारंपारिक लिक्विड ग्लास इफेक्ट मिळणार आहे जो पारदर्शक, बटणे, मेनू आणि नेव्हिगेशन बारच्या खाली बॅकग्राऊंड कलर्स दाखवतो. दुसरीकडे, टिंटेड मोड मजकूर आणि इंटरफेस घटक वाचण्यास सोपे करण्यासाठी अपारदर्शकता आणि कॉन्ट्रास्ट किंचित वाढवतो. 9to5Mac च्या अहवालानुसार, टिंटेड सेटिंग ही टॅब बार, नोटिफिकेशन आणि widgets सारख्या दृश्य घटकांमागील अपारदर्शकतेवर परिणाम करते. पण, ट्रान्सपरंट अॅप आयकॉनसारखे इतर डिझाइन घटक दिसू शकतात. ज्यामुळे लिक्विड ग्लासचे सौंदर्य टिकून राहते.
आता यूजर्सना लॉक स्क्रीनवरून swipe-to-open camera gesture डिसेबल करण्याची परवानगी देतो Settings > Camera > Lock Screen Swipe to Open Camera मध्ये ही सेटिंग यूजर्सना अनावधानाने कॅमेरा लाँच होण्यापासून रोखण्याचा पर्याय देते. हा स्वाइप पर्याय बंद असला तरीही, यूजर्सकडे कॅमेरा लवकर अॅक्सेस करण्याचे अनेक मार्ग आहेत, ज्यामध्ये अॅक्शन बटण, कॅमेरा कंट्रोल बटण किंवा लॉक स्क्रीन शॉर्टकट विजेटचा समावेश आहे.
Apple ने फोन सेटिंग्ज मेनूमध्ये एक नवीन Phone Haptics टॉगल देखील जोडला आहे. हा पर्याय यूजर्सना कॉल कनेक्ट किंवा डिस्कनेक्ट झाल्यावर येणारा हॅप्टिक फीडबॅक डिसेबल करण्यास सक्षम करतो.
https://beta.apple.com/sp/betaprogram/ वर पब्लिक बीटासाठी साइन अप करा.
आयफोनवर, सेटिंग्ज-जनरल-सॉफ्टवेअर अपडेट वर जा.
Beta Updates option वर टॅब करा. iOS 26.1 Public Beta निवडा.
सॉफ्टवेअर अपडेट पेजवर परत जा आणि डाउनलोड ची वाट पहा.
अटींशी सहमत व्हा आणि डाउनलोड प्रक्रिया सुरू करा.
डाउनलोड नंतर इन्स्टॉलेशन सुरू होईल.
जाहिरात
जाहिरात
New Images of Interstellar Object 3I/ATLAS Show a Giant Jet Shooting Toward the Sun
NASA’s Europa Clipper May Cross a Comet’s Tail, Offering Rare Glimpse of Interstellar Material
Newly Found ‘Super-Earth’ GJ 251 c Could Be One of the Most Promising Worlds for Alien Life
New Fossil Evidence Shows Dinosaurs Flourished Until Their Final Days