Photo Credit: Apple
Apple कडून iPhone 14 Plus च्या काही फोन मध्ये येत असलेल्या rear camera issue ला संबोधित करण्यासाठी विशेष service program जारी केला आहे. कंपनीच्या माहितीनुसार आता authorised Apple service providers कडे कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता फोनचं सर्व्हिसिंग करून मिळणार आहे. सिरीअल नंबर पडताळून त्यांच्यासाठी आता ही सर्व्हिस उपलब्ध आहे का? हे तपासले जाऊ शकते. तर ज्यांनी त्यांच्या iPhone 14 Plus च्या दुरूस्तीच्या कामासाठी पैसे मोजले आहेत त्यांना कंपनीकडून रिफंड दिले जाणार आहे.
अॅपल ने दिलेल्या माहितीनुसार, आता त्यांच्या फोनमध्ये काही iPhone 14 Plus मध्ये युजर्सना रेअर कॅमेरा वापरत असताना प्रिव्ह्यू दिसत नसल्याचं समोर आलं आहे. iPhone 14 Plus हे जे 10 एप्रिल 2023 ते 28 एप्रिल 2024 मध्ये बनले आहेत त्यांच्यामध्ये काही दोष असल्याचं समोर आलं आहे.
iPhone 14 Plus त्यांच्या फोनचा सिरिअल नंबर कंपनीच्या support page वर टाकून त्यांच्या फोन मध्ये दोष आहे का? आणि ते फ्री सर्व्हिज साठी पात्र आहेत का? हे तपासून पाहता येईल. अॅपलच्या माहितीनुसार, आता सर्व्हिस प्रोग्राम हा तो पहिल्यांदा विकत घेतल्यानंतर 3 वर्षापर्यंत लागू असणार आहे.
सिरीअल नंबर पाहण्यासाठी आता फोनच्या सेटिंग अॅप मध्ये जाऊन General > About वर जावं लागेल. Serial Number वर लॉग प्रेस केल्यानंतर तो कॉपी करण्याचा पर्याय मिळेल. आता हा नंबर कॉपी करून Appleच्या support page वर पेस्ट करा.
iPhone 14 Plus च्या काही युजर्सना rear camera service मध्ये असलेले दोष सुधारता येणार आहेत. ज्यात आता त्यांना आधी broken rear glass panel नीट करावं लागेल. हे फ्री सर्व्हिस प्रमाणे मोफत नसेल.
ज्यांनी rear camera साठी पैसे मोजले आहेत त्यांनी अॅपल कडे संपर्क साधल्यास त्यांना रिफंड मिळणार आहे अशी माहिती दिली आहे.
जाहिरात
जाहिरात