SBI क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर किमान 41,940 रुपयांच्या खरेदी मूल्यावर 4000 रुपयांची त्वरित सूट मिळू शकते.
iPhone 16 मध्ये 48MP मुख्य + 12MP अल्ट्रावाइड ड्युअल कॅमेरा आणि 12MP सेल्फी कॅमेरा आहे.
सगळीकडेच सध्या Black Friday सेल ची धूम सुरू असताना Amazon वरही आकर्षक ऑफर्सची घोषणा झाली आहे. या सेल मध्ये अमेझॉवर आयफोन 16 सवलतीच्या दरात खरेदी करता येणार आहे. जर तुम्ही स्मार्टफोन अपग्रेड करण्याची योजना आखत असाल, तर आता वेळ आली आहे, कारण OnePlus 15, iPhone 16 आणि इतर अनेक फ्लॅगशिप मॉडेल्स मोठ्या सवलतीच्या दरात उपलब्ध असतील. Amazon Black Friday Sale दरम्यान तुम्ही iPhone 16 वाजवी किमतीत कसा मिळवू शकता ते घ्या जाणून.Amazon वर iPhone 16 च्या किमतीत घट,2024 ला आलेल्या iPhone 16 बेस व्हेरिएंट 128 GB स्टोरेज फोनची किंमत 79,900 रुपयांपासून सुरू होते. या वर्षी iPhone 17 लाँच झाल्यानंतर, त्याची किंमत अधिकृतपणे 69,900 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली. अमेझॉन ब्लॅक फ्रायडे सेल ऑफरचा भाग म्हणून, ग्राहक iPhone 16 हा 62,900 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. ब्लॅक फ्रायडे डीलचा भाग म्हणून, iPhone 16 वर 3000 रुपयांची सूट दिली आहे, ज्यामुळे हा स्मार्टफोन 66,900 रुपयांच्या सवलतीच्या किमतीत उपलब्ध आहे, ज्यामुळे ग्राहकांना फ्लॅगशिप-ग्रेड स्मार्टफोनवर 16% सूट मिळते.
विक्री सवलतीव्यतिरिक्त, ग्राहक बँक आणि एक्सचेंज ऑफरद्वारे आणखी सवलती देखील मिळवू शकतात. अमेझॉन लिस्टिंगनुसार, ग्राहकांना SBI क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर किमान 41,940 रुपयांच्या खरेदी मूल्यावर 4000 रुपयांची त्वरित सूट मिळू शकते. ग्राहक ICICI क्रेडिट कार्ड वापरून देखील हीच सूट मिळवू शकतात. ही डील Apple iPhone 16 हा 128 GB स्टोरेज व्हेरिएंटच्या पाचही रंग पर्यायांवर वैध आहे.
Amazon एक्सचेंज बोनस म्हणून 47,650 रुपयांपर्यंतची सूट देखील देते, ज्याचा वापर नवीन स्मार्टफोनची किंमत आणखी कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो. पण सवलतीची रक्कम तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या मॉडेल आणि स्थितीनुसार तसेच तुमच्या लोकेशनच्या ऑफरच्या उपलब्धतेनुसार बदलू शकते.
Apple iPhone 16 मध्ये काही आकर्षक आणि आशादायक फीचर्स आहेत. या स्मार्टफोनमध्ये 6.1-इंचाचा OLED डिस्प्ले आहे जो 60Hz रिफ्रेश रेट देतो. तो A18 चिपसह 8GB रॅमसह सपोर्टेड आहे, ज्यामुळे स्मार्टफोन Apple Intelligence ला सपोर्ट करतो. iPhone 16 मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये 48MP चा मुख्य कॅमेरा आणि 12MP चा अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. 12MP चा सेल्फी शूटर आहे.
जाहिरात
जाहिरात