iPhone 17 Pro, Pro Max लाँच; iPhone मध्ये प्रथमच ट्रिपल 48MP कॅमेरा सेटअप

भारतात, iPhone 17 Pro ची किंमत 1,34,900 रुपये आणि 17 Pro Max ची किंमत 1,49,900 रुपये आहे.

iPhone 17 Pro, Pro Max लाँच;  iPhone मध्ये प्रथमच ट्रिपल 48MP कॅमेरा सेटअप

Photo Credit: Apple

अ‍ॅपलचे आयफोन १७ प्रो मॉडेल आयफोन १६ प्रो आणि आयफोन १६ प्रो मॅक्स नंतर आले आहेत

महत्वाचे मुद्दे
  • iPhone 17 Pro,17 Pro Max स्मार्टफोन्स कॉस्मिक ऑरेंज, डीप ब्लू व सिल्व्हर
  • यंदाच्या फोन्समध्ये iPhone 15 Pro, iPhone 16 Pro मॉडेल्समध्ये दिसणारी टाय
  • iPhone 17 Pro मॉडेल्समध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप
जाहिरात

अमेरिकेमध्ये 'Awe Dropping' इव्हेंट मध्ये अॅपलचे नवीन iPhone 17 Pro आणि 17 Pro Max चे अनावरण करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत हे प्रो मॉडेल्स स्टँडर्ड आयफोन १७ आणि नवीन एअर मॉडेलसोबत उपलब्ध असतील. अपेक्षेप्रमाणे, आयफोन १७ प्रो मॉडेल्स अॅपलच्या A19 प्रो चिप, टॉप-टियर सिलिकॉनचा सपोर्ट असणारे आहेत. दोन्ही प्रो मॉडेल्स iOS 26 वर चालतात. सीईओ टिम कुक यांनी एका प्री-रेकॉर्ड केलेल्या कार्यक्रमादरम्यान कंपनीच्या नव्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्सची घोषणा केली आहे.

iPhone 17 Pro आणि 17 Pro Max ची किंमत आणि उपलब्धता

अमेरिकेत iPhone 17 Pro ची २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत $1099 पासून सुरू होते, तर 17 Pro Max ची २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत $1199 पासून सुरू होते. भारतात, iPhone 17 Pro ची किंमत 1,34,900 रुपये आणि 17 Pro Max ची किंमत 1,49,900 रुपये आहे. हे स्मार्टफोन्स कॉस्मिक ऑरेंज, डीप ब्लू आणि सिल्व्हर रंगात उपलब्ध असतील.

iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max ची फीचर्स

iPhone 17 Pro मॉडेल्स पुन्हा अॅल्युमिनियम बिल्डमध्ये परतले आहेत, म्हणजेच या वर्षीच्या मॉडेल्समध्ये iPhone 15 Pro आणि iPhone 16 Pro मॉडेल्समध्ये दिसणारी टायटॅनियम बॉडी नसेल. iPhone 17 Pro हा Apple चा पहिलाच फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे ज्यामध्ये व्हेपर चेंबर कूलिंग सिस्टम आहे, ज्यामुळे मोठ्या कामांदरम्यान जास्त काळ परफॉर्मन्स टिकतो. iPhone 17 Pro मध्ये 6.3-इंच Super Retina XDR डिस्प्ले असून ProMotion तंत्रज्ञानासह 120Hz रिफ्रेश रेट मिळतो, तर 17 Pro Max मध्ये 6.9-इंच डिस्प्ले आहे. Ceramic Shield 2 मुळे स्क्रीनला तीन पट जास्त स्क्रॅच रेसिस्टन्स मिळते. दोन्ही मॉडेल्सचा पीक ब्राइटनेस 3,000 nits आहे. यात नवा A19 Pro चिपसेट असून व्हेपर चेंबर कूलिंगसह येतो.

iPhone 17 Pro मॉडेल्समध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 48MP प्रायमरी, 48MP अल्ट्रा-वाइड आणि 48MP टेलिफोटो लेन्स आहे. ही पहिलीच वेळ आहे की iPhone च्या मागील तिन्ही कॅमेऱ्यांची रिझोल्यूशन सारखी आहे. टेलिफोटो कॅमेरा मागील 12MP मॉडेलपेक्षा मोठा अपग्रेड असून तो 56% मोठा आहे आणि 8x ऑप्टिकल झूम तसेच 40x डिजिटल झूम देतो. फ्रंटला 18MP कॅमेरा असून त्यात Centre Stage फीचरद्वारे फोटो डायनॅमिकली फ्रेम केले जातात.

Comments

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »