अहवालानुसार, अॅपलचे लक्ष प्रामुख्याने बेस मॉडेल्सच्या उत्पादनावर आहे आणि लाँच झाल्यानंतर काही आठवड्यांनंतर प्रो व्हेरिएंटची क्षमता वाढण्याची शक्यता आहे
Photo Credit: Apple
भारतात आयफोन १७ ची किंमत २५६ जीबीच्या बेस कॉन्फिगरेशनसाठी ८२,९०० रुपये आहे
मागील आठवड्यात अमेरिकेमध्ये‘Awe Dropping' या कार्यक्रमात अॅपल ने आयफोनची नवी सीरीज लॉन्च केली आहे. दरवर्षी अॅपल कडून सप्टेंबर महिन्यात नव्या स्मार्टफोन सीरीजची घोषणा होते. जगभरातील आयफोन प्रेमींचं या कार्यक्रमात होणार्या घोषणांकडे लक्ष असते. कंपनीकडून यंदा 9 सप्टेंबरच्या कार्यक्रमात आयफोन १७ चे नवीन मॉडेल लाँच करण्यात आले, ज्यामध्ये आयफोन एअर हा एक नवीन प्रकार समाविष्ट करण्यात आला आहे. आयफोन एअर आतापर्यंत जगभरात लाँच झालेला सर्वात स्लीम आणि सर्वोत्तम फोन असल्याचा दावा अॅपल कडून करण्यात आला आहे. नवीन आयफोन १७ मॉडेल्सची सध्या सर्वत्र चर्चा आहे आणि अनेक भारतीय यूजर्सना अखेर हा फोन हातात येण्यासाठी वाट पहावी लागेल. नेमकी ही वाट का बघावी लगणार आहे? घ्या जाणून
मीडीया रिपोर्ट्सनुसार, किरकोळ विक्रेत्यांनी iPhone 17 Series आणि आयफोन एअरच्या तुरळक पुरवठ्याचा इशारा दिला आहे. सूत्रांचा हवाला देत, अहवालात या कमतरतेचे कारण भारतातील अॅपलच्या विस्तारत्या रिटेल नेटवर्कला दिले जात आहे. सध्या यामुळेच आयफोन १७ प्रो आणि आयफोन १७ प्रो मॅक्स स्टोअर मध्ये कमी प्रमाणात येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
दुसऱ्या एका अहवालानुसार, अॅपलचे लक्ष प्रामुख्याने बेस मॉडेल्सच्या उत्पादनावर आहे आणि लाँच झाल्यानंतर काही आठवड्यांनंतर प्रो व्हेरिएंटची क्षमता वाढण्याची शक्यता आहे. अॅपल 500 युनिट्सच्या शिपमेंटमध्ये आयफोन १७ प्रो आणि प्रो मॅक्सची फक्त 50 युनिट्स पाठवत असल्याची माहिती समोर येत आहे. हा उशीर केवळ ऑफलाइन स्टोअर्ससाठी नाही तर अॅपलच्या वेबसाइटसह ऑनलाइन चॅनेलसाठीही आहे.
अॅपलच्या ऑनलाइन स्टोअरनुसार, बेस व्हेरिएंट सप्टेंबरच्या अखेरीस ते सहा ऑक्टोबर दरम्यान दिल्लीसारख्या टॉप टियर शहरांमध्ये पाठवला जाईल. त्यामुळे त्याच्या वरील व्हेरिएंट्ससाठी प्रतिक्षा अजून वाढण्याचा अंदाज आहे.
दरम्यान 12 सप्टेंबरपासून आयफोन 17 ची प्री ऑर्डर सुरू झाली असून आता 19 सप्टेंबर पासून फोनची विक्री सुरू होणार आहे. मात्र सर्वांना आयफोन 17 सिरीज किंवा आयफोन एअर ऑर्डर एकाच तारखेला मिळणार नाहीत.अहवालानुसार, ५१२ जीबी आणि १ टीबी व्हेरिएंटसह उच्च-क्षमतेच्या एडिशन्स अत्यंत दुर्मिळ आहेत. त्यामुळे, ग्राहकांना ते खरेदी करण्यासाठी अॅपलच्या ऑनलाइन स्टोअर किंवा त्याच्या रिटेल चॅनेलकडे जावे लागू शकते. पण तरीही, विलंब होऊ शकतो.
जाहिरात
जाहिरात