आयफोन 17 सिरीज 9 सप्टेंबरला होणार लाँच; आयफोन 17 एअर ठरणार लक्ष्यवेधी, पहा अपडेट्स

Apple चा कार्यक्रम 9 सप्टेंबरला भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता Apple च्या यूट्यूब चॅनेलवर किंवा Apple वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीम केला जाईल.

आयफोन 17 सिरीज 9 सप्टेंबरला होणार लाँच; आयफोन 17 एअर ठरणार लक्ष्यवेधी, पहा अपडेट्स

Photo Credit: Apple

अ‍ॅपल ९ सप्टेंबर रोजी 'अवे ड्रॉपिंग' नावाचा पुढील लाँच कार्यक्रम आयोजित करणार आहे

महत्वाचे मुद्दे
  • Apple त्यांच्या आयफोन प्लस व्हेरिएंटच्या जागी नवीन iPhone 17 Air आणण्य
  • iPhone 17 Air हा आतापर्यंतचा slimmest iPhone आयफोन म्हणून समोर येण्याचा
  • 17 Air मध्ये Apple चा C1 मॉडेम असण्याची अपेक्षा आहे,जो पहिल्यांदा iPhone
जाहिरात

Apple ने त्यांच्या आगामी आयफोन सीरीजच्या लॉन्चिंगच्या कार्यक्रमाची तारीख जाहीर केली आहे. Apple चा हा कार्यक्रम मंगळवार, ९ सप्टेंबर रोजी होणार आहे. यामध्ये फ्लॅगशिप फोन, कदाचित iPhone 17 series मधील पहिल्या Air variant च्या घोषणेची शक्यता आहे. Apple चे CEO Tim Cook यांनी X वर कार्यक्रमाची तारीख जाहीर केली. त्यामधील माहितीनुसार, “मंगळवार, 9 सप्टेंबर रोजी एका Apple च्या कार्यक्रमासाठी सज्ज व्हा” हा कार्यक्रम कंपनीच्या परंपरेनुसार कॅलिफोर्नियातील Cupertino येथील Apple पार्क येथे आयोजित केला जाईल.” असं नमूद केले आहे. लाँच टीझरमध्ये Apple ने त्यांच्या लोगोमध्ये निळा आणि पिवळा ग्लो दाखवला आहे, जो कदाचित येणाऱ्या लाँचमध्ये नवीन फीचर किंवा बहुप्रतिक्षित नवीन आयफोन एअर प्रकाराचा संकेत देत असेल.

Apple event 2025 मध्ये काय होणार?

Apple अनेक नवीन अपग्रेड्ससह iPhone 17 series लाँच करण्याची अपेक्षा आहे. उद्योग क्षेत्रातील अफवांनुसार, यावर्षी Apple त्यांच्या आयफोन प्लस व्हेरिएंटच्या जागी नवीन iPhone 17 Air आणण्याची शक्यता आहे. हा फोन आतापर्यंतचा slimmest iPhone आयफोन म्हणून येईल असे म्हटले जाते, अफवांमध्ये फक्त 5.5 मिमी जाडी असल्याचे संकेत मिळत आहेत. स्लिम प्रोफाइलमध्ये बॅटरी क्षमता कमी होण्याची शक्यता आहे, सुमारे 2900mAh असू शकते. 17 Air मध्ये Apple चा C1 मॉडेम असण्याची अपेक्षा आहे, जो पहिल्यांदा iPhone 16e मध्ये वापरला गेला होता.

iPhone 17 Air व्यतिरिक्त, नियमित लाइन-अपमध्ये ब्रेक कव्हर असतील ज्यात iPhone 17, iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max असू शकतात. 17 Pro आणि 17 Pro Max फोनच्या मागील बाजूस पुन्हा डिझाइन केलेला कॅमेरा मॉड्यूल असण्याची अपेक्षा आहे. हे मॉड्यूल अॅल्युमिनियमपासून बनवले जाईल आणि काचेच्या बॅकला जोडले जाईल अशीही चर्चा आहे.

iPhone 17 series ची भारतात अपेक्षित किंमत

iPhone 17 लाइन-अपच्या किमती 16 सिरीजच्या तुलनेत वाढू शकतात. जी 79,900 रुपयांना लाँच करण्यात आली होती. भारतात iPhone 17 ची सुरुवात 79,990 रुपयांपासून होण्याची अपेक्षा आहे. तर iPhone 17 Air हा 89,990 रुपयांच्या आत असू शकतो. iPhone 17 लाइन-अपचा प्रो व्हेरिएंट 1,34,990 रुपयांना लाँच होण्याची चर्चा आहे. 17 प्रो मॅक्सची किंमत 1,64,990 रुपये असण्याची अपेक्षा आहे. संदर्भात 16 प्रो मॅक्स 1,44,990 रुपयांना लाँच करण्यात आला होता.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Apple iPhone 17 Air च्या लॉन्चपूर्वी समोर आले अपडेट्स
  2. Apple iPhone 17 ‘Awe Dropping’ कार्यक्रम आज; महत्त्वाच्या घोषणांबाबत वाढली उत्सुकता
  3. iPhone 17 Pro मध्ये 8X झूम, प्रगत कूलिंग टेक्नॉलॉजी असणार? पहा अपडेट्स
  4. Apple Watch Series 11 आणि Ultra 3 मध्ये काय आहे खास? घ्या जाणून अपडेट्स
  5. Motorola Edge 60 Neo सोबत पॉवरफुल Moto G06 आणि G06 Power देखील आले बाजारात
  6. अवघ्या 5.9mm जाडीचा Nubia Air, 5000mAh बॅटरीसह ग्लोबल मार्केट मध्ये दाखल; पहा किंमत, डिझाईन कसे?
  7. iPhone 17 Pro च्या कूलिंग टेक्नोलॉजीमध्ये मिळणार मोठे अपडेट्स
  8. 15 सप्टेंबरला भारतात येणार Oppo F31 Series; डिझाईन, फीचर्स लीक
  9. आयफोन 17 सिरीज 9 सप्टेंबरला होणार लाँच; आयफोन 17 एअर ठरणार लक्ष्यवेधी, पहा अपडेट्स
  10. Oppo F31, F31 Pro, F31 Pro+ च्या डिझाईनची चर्चा; 7,000mAh बॅटरी च्या समावेशाचा अंदाज
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »