Photo Credit: Apple
iPhone SE 4 बद्दल चर्चा सध्या खूप जोरात आहे पण अधिकृत पणे त्याची घोषणा होतेय का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. Bloomberg च्या Mark Gurman कडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार, Apple कडून iPhone SE 4 चं लॉन्च 2025 च्या सुरूवातीला होण्याची शक्यता आहे. iPad Air सह नवा वाजवी किंमतीमधील आयफोन आणि अन्य अॅक्सेसरीज यामध्ये लॉन्च केल्या जाऊ शकतात. दरम्यान iPhone SE 4 मध्ये होम बटण जाऊ शकतं आणि त्याऐवजी Face ID येऊ शकेल. या फोन सोबत Apple Intelligence features असू शकतात.
Bloomberg च्या नव्या रिपोर्ट्स नुसार, Mark Gurman ने सूत्रांच्या माहितीनुसर अॅपल अपडेटेड आयफोन SE च्या प्रोडक्शनच्या तयारीमध्ये आहे. सोबतच कंपनी नवे iPad Air models आणि keyboards लॉन्च करण्याच्या तयारीमध्ये आहे.
Apple आता जुनं होम बटण डिझाईन काढून टाकत edge-to-edge screen चा विचार करत आहे. यामध्ये Face ID, Apple Intelligence चा समावेश केला जाऊ शकतो. हे फीचर आता लॉन्च झालेल्या iPhone 16 आणि iPhone 15 च्या टॉप मॉडेल मध्ये आहे.
iPhone SE 4 मध्ये 2022 च्या iPhone 14 प्रमाणे डिझाईन असण्याचा अंदाज आहे. सध्या बाजारात असलेला iPhone SE हा iPhone 8 प्रमाणे आहे. त्यामध्ये touch ID आहे तर single rear camera आहे.
नव्या iPhone SE च्या मदतीने अॅपल बाजारात असलेल्या low-end smartphone मध्ये आघाडीवर असेल. या फोनच्या मदतीने ते Huawei आणि Xiaomi मुळे गमावलेलं मार्केट जिंकू शकेल.
iPhone SE 4 व्यतिरिक्त Apple नवे iPad Air models आणतील. J607 आणि J637 हे 11 आणि 13 इंच चे असतील. Magic Keyboard accessory चे अपडेटेड व्हर्जन येऊ शकते. Mac mini च्या revamped, MacBook Pros चे अपडेटेड व्हर्जन आणि iMacs M4 chip सह येऊ शकते. Apple Intelligence features देखील 2025 मध्ये येऊ शकते.
iPhone SE 4 हा एकच 48-megapixel rear camera सह येण्याचा अंदाज आहे. त्यासोबत त्यामध्ये 6.06-inch panel आणि 60Hz refresh rate असेल. Apple's A18 chipset ही 6GB आणि 8GB LPDDR5 RAM सह येऊ शकते. किंमतीचा विचार केल्यास हा $499 ते $549 या रेंज मध्ये असू शकतो. iPhone SE (2022)$429 मध्ये आला होता.
जाहिरात
जाहिरात