iQOO 13 डिसेंबर मध्ये येणार; 6,150mAh बॅटरी, 50-megapixel ट्रीपल रेअर कॅमेरा युनिट सह दमदार फीचर्स

iQOO 13 डिसेंबर मध्ये येणार; 6,150mAh बॅटरी,  50-megapixel ट्रीपल रेअर कॅमेरा युनिट सह दमदार फीचर्स

Photo Credit: iQOO

iQOO 13 is offered in China in four colour options

महत्वाचे मुद्दे
  • iQOO 13 डिसेंबर 2024 ला भारतात लॉन्च होणार
  • अधिकृत iQOO e-store, अमेझॉन वर विक्रीसाठी होणार उपलब्ध
  • चीन मध्ये हा फोन 30 ऑक्टोबरला समोर आला आहे
जाहिरात

iQOO 13 भारतामध्ये लॉन्च साठी सज्ज झाला आहे. लवकरच हा फोन बाजारामध्ये येणार आहे. कंपनीने या फोन मध्ये Qualcomm ची लेटेस्ट octa-core Snapdragon 8 Elite chipset असणार आहे याची पुष्टी केली आहे. या हॅन्डसेटचे डिझाईन आणि डिस्प्ले फीचर्स समोर आले आहेत. आता iQOO कडून त्यांचा आगामी स्मार्टफोन iQOO 13 भारतामध्ये कधी येणार याची टाईमलाईन सांगण्यात आली आहे. चीन मध्ये हा फोन 30 ऑक्टोबरला समोर आला आहे. डिझाईन आणि की स्पेसिफिकेशन मध्ये हा फोन भारतामध्येही चीनी स्मार्टफोन प्रमाणेच असणार आहे.

iQOO 13 भारतामध्ये कधी होणार लॉन्च?

iQOO 13 भारतामध्ये डिसेंबर महिन्यात लॉन्च होण्याच्या तयारीमध्ये आहे. BMW Motorsport, सोबत झालेल्या सहयोगामुळे हा फोन काळा, निळा आणि लाल रंगांच्या पॅटर्न मध्ये दिसणार आहे. डिसेंबर 2023 मध्ये iQOO 12,बाजारामध्ये आला होता.

भारतामधील iQOO 13 हा स्मार्टफोन अधिकृत iQOO e-store मध्ये तसेच अमेझॉन वर विक्रीसाठी खुला असणार आहे. या फोनसाठी अमेझॉनची मायक्रोसाईट देखील लाईव्ह करण्यात आली आहे. या फोन मध्ये Halo light feature असणार आहे. मायक्रोसाईटच्या माहितीनुसार, 2K LTPO AMOLED display panel असणार आहे तर 144Hz refresh rate असणार आहे. या फोनमध्ये Snapdragon 8 Elite SoC असेल जी Q2 gaming chipset सोबत जोडलेली असेल.

iQOO 13 ची फीचर्स काय?

iQOO 13 चीन मध्ये Snapdragon 8 Elite SoC सह लॉन्च करण्यात आला आहे. हा in-house Q2 gaming chipset सह फोन आहे. ज्यात रॅम 16GB पर्यंत आणि onboard storage 1TB पर्यंत असणार आहे. हा फोन Android 15-based OriginOS 5 वर असणार आहे. भारतामध्ये हा फोन FuntouchOS 15 skin on top वर येणार आहे. या हॅन्डसेट मध्ये 6,150mAh बॅटरी असणार आहे. 120W wired फास्ट चार्जिंग सपोर्ट असणार आहे.

iQOO 13 हा 6.82-inch 2K (1,440 x 3,168 pixels) सह BOE Q10 8T LTPO 2.0 OLED screen सोबत येणार आहे. यामध्ये 144Hz refresh rate आहे तर HDR support असणार आहे. फोनचा कॅमेरा 50-megapixel ट्रीपल रेअर कॅमेरा युनिट सह आहे. ज्यामध्ये 50-megapixel telephoto camera आहे. 50-megapixel अल्ट्रा वाईट शूटर आहे. फ्रंट फेसिंग कॅमेरा हा 32-megapixel sensor सह आहे. तर या हॅन्डसेट मध्ये IP68 and IP69-rated build असणार आहे. ज्यात in-display ultrasonic fingerprint sensor असणार आहे.

Comments
पुढील वाचा: iQOO 13, iQOO 13 India launch, iQOO 13 Features
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2024. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »