Photo Credit: iQOO
iQOO 13 (चित्रात) डिसेंबर २०२४ मध्ये भारतात लाँच करण्यात आला
iQOO भारतात त्यांच्या प्रमुख iQOO 13 स्मार्टफोनची रंग श्रेणी वाढवण्यासाठी सज्ज आहे. iQOO 13 हा स्मार्टफोन 4 जुलै रोजी Amazon द्वारे भारतात एका नवीन रंगामध्ये म्हणजे हिरव्या रंगाच्या व्हेरिएंटमध्ये लाँच होणार आहे. हा स्मार्टफोन सध्याच्या लाइनअपचा विस्तार करत आहे, ज्यामध्ये सध्या Legend आणि Nardo Grey पर्यायांचा समावेश आहे. हा नवीन व्हेरिएंट पुढील आठवड्यात Amazon च्या प्राइम डे लाँचचा भाग आहे. फोनच्या हार्डवेअरमध्ये कोणताही बदल झालेला नाही. iQOO 13 मध्ये Snapdragon 8 Elite चिपसेट आहे, जो डेडिकेटेड Q2 गेमिंग चिपसह जोडलेला आहे. यामध्ये 2K रिझोल्यूशनवर 144fps गेमिंगला सपोर्ट आहे . यात 144Hz व्हेरिएबल रिफ्रेश रेटसह 6.82-इंचाचा 2K LTPO AMOLED डिस्प्ले आणि उच्च ब्राइटनेस मोडमध्ये 1,800 निट्स पर्यंत ब्राइटनेस आहे. यात thermal management साठी 7,000 चौरस मिमी व्हेपर चेंबर कूलिंग सिस्टम देखील समाविष्ट आहे.
फोनमध्ये 120 W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,000mAh बॅटरी आहे.फोन 0 ते 40% चार्ज होण्यासाठी फक्त 10 मिनिटे आणि 100% चार्ज होण्यासाठी 30 मिनिटे लागतात. नेहमी फिरत राहणाऱ्यांसाठी हे एक मोठे वरदान आहे. कॅमेरा स्पेसिफिकेशन्समध्ये ट्रिपल रिअर सेटअपचा समावेश आहे. 50MP Sony IMX921 primary sensor सोबत OIS आहे .50MP telephoto lens सह 2x optical zoom , 4x lossless zoom आहे. फ्रंटला 32 MP selfie camera आहे.
फोनच्या इतर फीचर्स मध्ये इन-डिस्प्ले अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर, स्टीरिओ स्पीकर्स, IP68 आणि IP69 रेट केलेले धूळ आणि पाण्याला रोखण्याची क्षमता आणि Google च्या सर्कल टू सर्च आणि AI इरेज फीचर्ससाठी समर्थन समाविष्ट आहे. हे Android 15 वर आधारित Funtouch OS 15 चालवते.गेमर्सना 7K Ultra VC cooling system, 72 मोडसह मॉन्स्टर हॅलो लाइटिंग, बायपास चार्जिंग सपोर्ट आणि अॅड्रेनो मोशन इंजिन 2.0 आवडेल. हे डिव्हाइस धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP68 आणि IP69 प्रमाणित आहे, जे सर्व वातावरणात टिकाऊपणा सुनिश्चित करते.
iQOO 13 ग्रीन व्हेरिएंट इतर रंगांच्या व्हेरिएंट्सप्रमाणेच दोन कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध असण्याची अपेक्षा आहे. 12GB RAM आणि 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत ₹54,999 आहे आणि 16GB RAM आणि 512GB स्टोरेज मॉडेलची किंमत ₹59,999 आहे. सध्याच्या रंग पर्यायांच्या तुलनेत किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. चीन मध्ये हिरव्या रंगातील फोनची विक्री यापूर्वीच सुरू झाली आहे. Amazon microsite च्या माहितीवरून भारतात आता 4 जुलै पासून या फोनची विक्री सुरू होत आहे.
जाहिरात
जाहिरात