अमेझॉन कडून निवडक स्मार्टफोनवर नो-कॉस्ट EMI पर्याय देखील देणार आहे.
Photo Credit: iQOO
Amazon Great Indian Festival Sale 2025 मध्ये iQOO 13 (चित्रात) सवलतीच्या दरात मिळेल
ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 2025 आता 23 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या सेलमध्ये मोबाईल फोन, स्मार्टवॉच, TWS इअरबड्स, लॅपटॉप, पीसी, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन आणि स्मार्ट होम अप्लायन्सेस सोबत अनेक इलेक्ट्रॉनिक्सवर मोठ्या सवलती, कॅशबॅक ऑफर्स, एक्सचेंज बोनस आणि नो-कॉस्ट EMI पर्याय उपलब्ध असणार आहे. सेलपूर्वी iQOO (Vivoची सब-ब्रँड) ने आपल्या अनेक स्मार्टफोनवर ऑफर जाहीर केल्या आहेत. कंपनीच्या फ्लॅगशिप iQOO 13 सह निवडक हँडसेट्सवर ग्राहकांना तब्बल 4,000 रूपयांपर्यंत सूट मिळणार आहे. या ऑफर्स केवळ ॲमेझॉनवरच नव्हे तर iQOOच्या अधिकृत ऑनलाइन स्टोअरवर देखील उपलब्ध असणार आहेत. अमेझॉन कडून निवडक स्मार्टफोनवर नो-कॉस्ट EMI पर्याय देखील देणार आहे. उदाहरणार्थ, जर आपण iQOO Z10R, iQOO Z10, iQOO Neo 10R किंवा iQOO Neo 10 खरेदी केला, तर ग्राहकांना 3 ते 6 महिन्यांपर्यंत व्याजमुक्त EMI ची सुविधा दिली जाणार आहे. तर कंपनीचा फ्लॅगशिप iQOO 13 खरेदी करणार्या ग्राहकांना 3, 6 किंवा 9 महिन्यांचे नो-कॉस्ट EMI पर्याय निवडता येतील.
आगामी Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल २०२५ दरम्यान, प्राइम सबस्क्रिप्शनसह किंवा त्याशिवाय, फोन घेण्यार्यांसाठीक iQOO स्मार्टफोनवरील सर्वोत्तम डीलची यादी येथे आहे.
मॉडेल | लिस्ट प्राईज | सेल प्राईज |
iQOO Z10 Lite | Rs. 9,998 | Rs. 8,999 |
iQOO Z10x | Rs. 13,498 | Rs. 11,999 |
iQOO Z10R | Rs. 19,498 | Rs. 17,499 |
iQOO Z10 | Rs. 21,998 | Rs. 18,999 |
iQOO Neo 10R | Rs. 26,999 | Rs. 23,999 |
iQOO Neo 10 | Rs. 33,998 | Rs. 29,999 |
iQOO 13 | Rs. 54,998 | Rs. 50,999 |
iQOO 13 हा लाइनअपमधील सर्वात प्रीमियम स्मार्टफोन आहे. भारतातील 55,000 रूपयांंपेक्षा कमी किमतीच्या सर्वोत्तम गेमिंग स्मार्टफोनपैकी एक आहे. स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेटचा सपोर्ट असणारा हा फोन सॅमसंगच्या गॅलेक्सी S25 अल्ट्रा आणि वनप्लस 13 ला टक्कर देणारा स्पीड देतो. 144Hz 2K AMOLED डिस्प्ले अल्ट्रा-स्मूथ गेमप्ले सुनिश्चित करतो, तर ट्रिपल 50MP कॅमेरा सिस्टम फ्लॅगशिप-ग्रेड फोटोग्राफी आहे.
जाहिरात
जाहिरात