Photo Credit: iQOO
iQOO 13 भारतामध्ये 3 डिसेंबर दिवशी लॉन्च होणार आहे. हा फोन बाजारात येण्यापूर्वी आता tipster कडून iQOO 13 च्या भारतामधील किंमतीची माहिती समोर आली आहे. iQOO 13 भारतापूर्वी चीन मध्ये ऑक्टोबर दिवशी लॉन्च झाला आहे. हा Qualcomm ची Snapdragon 8 Elite chip असलेला पहिला स्मार्टफोन आहे. iQOO 13 हा Android 15 वर चालतो. यामध्ये 50-megapixel triple rear camera युनिट आहे. या फोनला IP68 आणि IP69 रेटिंग आहे. त्यामुळे हा फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित आहे.
Tipster Mukul Sharma (@stufflistings) ने X वर केलेल्या पोस्टनुसार, 12GB RAM + 256GB storage व्हेरिएंटची किंमत Rs. 55,000 पेक्षा कमी असणार आहे. या फोनचा iQOO 12 देखील याच रॅम, स्टोरेज सह आला होता तेव्हा त्याची किंमत 52,999 पेक्षा कमी होती. iQOO च्या फोनवर काही बॅंक ऑफर्स आणि अन्य ऑफर्स जाहीर करण्याची अपेक्षा आहे.
चीन मध्ये iQOO 13 ची किंमत CNY 3,999 पासून सुरू आहे. भारतीय रूपयांमध्ये त्याची किंमत 47,200 आहे. ही किंमत 12GB RAM + 256GB पर्यायासाठी आहे. तर 16GB + 1TB रॅम आणि स्टोरेज साठी CNY 5,199 मोजावे लागत आहेत. त्याची भारतीय रूपयांमध्ये किंमत 61,400 रूपये आहे.
iQOO 13 भारतामध्ये 3 डिसेंबरला लॉन्च होणार आहे. हा Vivo चा सब ब्रॅन्ड असून सध्या तो फीचर्सची माहिती देत आहे. हा फोन विक्रीसाठी iQOO e-store आणि अमेझॉन वर उपलब्ध होणार आहे. Snapdragon 8 Elite chipset सह येणारा हा भारतातील पहिला फोन आहे.
भारतामध्ये iQOO 13 या फोनमध्ये चार Android version upgrades मिळणार आहेत. तर 5 वर्षाची security updates मिळणार आहे. यामध्ये ट्रिपल रेअर कॅमेरा युनिट आहे. यामध्ये 50-megapixel primary camera आहे जो Sony IMX 921 sensor आणि 50-megapixel Sony portrait sensor आणि 50-megapixel ultra-wide camera आहे. या स्मार्टफोन मध्ये 32-megapixel selfie sensor आहे. तर भारतामधील व्हेरिएंट मध्ये 6,000mAh बॅटरी आणि 120W charging support आहे.
जाहिरात
जाहिरात