iQOO 15 फोन 20 ऑक्टोबरला चीनमध्ये लॉन्च झाल्यानंतर आता हा भारतामध्येही दाखल होण्यास सज्ज झाला आहे.
Photo Credit: iQOO
iQOO 15 मध्ये 32-मेगापिक्सेलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे.
iQOO 15 हा चीन मध्ये ऑक्टोबर 20 दिवशी लॉन्च झाला आहे. चीन पाठोपाठ आता हा भारतामध्येही दाखल होण्यास सज्ज आहे. अमेझॉन ई कॉमर्स साईटवर सध्या यासाठी एक मायक्रोसाईट असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे भारतामध्ये हा स्मार्टफोन अमेझॉनच्या माध्यमातून ग्राहकांसाठी खुला असेल अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान iQOO 15 फोन Android 16-based OriginOS 6 वर चालतो. यामध्ये फ्लॅगशीप Snapdragon 8 Elite Gen 5 chipset चा समावेश आहे. iQOO India CEO Nipun Marya यांनी फोन 2025 च्या नोव्हेंबर महिन्यात फोनच्या लॉन्च होण्याचे संकेत दिले आहेत. मात्र अद्याप भारतातील फोन लॉन्च बद्दलची निश्चित तारीख iQOO कडून जाहीर करण्यात आलेली नाही.
iQOO 15 ची खास वेबसाईट आता अमेझॉन वर लाईव्ह करण्यात आली आहे. या फोनचा भारतामधील लॉन्च देखील नोव्हेंबर मध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. हा फोन चीन मध्ये पहिल्यांदा 20 ऑक्टोबरला समोर आला होता हा फोन Android 16 वर OriginOS 6 वर चालतो. iQOO India कडून भारतातील या फोनच्या उपलब्धतेबद्दल कोणतीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. चीन मध्ये iQOO 15 हा फोन CNY 4,199 (अंदाजे Rs. 52,000) मध्ये उपलब्ध असणार आहे. तो बेस मॉडेल 12GB RAM + 256GB Storage variant मध्ये आहे. तर हा फोन Legendary Edition, Track Edition, Lingyun,आणि Wilderness या चार रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.
चायनीज व्हर्जेनमध्ये iQOO 15 हा फोन 6.85-inch 2K Samsung M14 AMOLED display आणि 130Hz sampling rate, 144Hz refresh rate,1.07 billion colours 508 ppi,आणि 94.37% screen-to-body ratio मध्ये उपलब्ध असण्याचा अंदाज आहे. हा फोन 3nm octa-core Snapdragon 8 Elite Gen 5 chip वर चालतो. Adreno 840 GPU,आणि 16GB LPDDR5X Ultra RAM आणि 1TB UFS 4.1 storage सह एक मालकीचा Q3 gaming chip सह येणार आहे.
फोटोज आणि व्हिडिओजसाठी, iQOO 15 मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपचा समावेश आहे. फोनमध्ये 50MP मुख्य शूटर, 50MP पेरिस्कोप लेन्स आणि 50MP वाइड-अँगल कॅमेरा आहे . समोर 32MP सेल्फी कॅमेरा आहे. हँडसेटमध्ये 100W वायर्ड आणि 40W वायरलेस फास्ट चार्जिंगसह 7,000mAh बॅटरी आहे, ज्यामुळे ते गेमिंग, फोटोग्राफी आणि अधिक वेळ वापरासाठी एक पॉवरहाऊस बनते.
जाहिरात
जाहिरात
Assassin's Creed Shadows Launches on Nintendo Switch 2 on December 2