iQOO च्या माहितीनुसार, पहिल्यांदाच अशाप्रकारे स्मार्टफोनमध्ये VC cooling solution देण्यात आले आहे. ही कूलिंग सिस्टम डबल लेयर असणार आहे.
Photo Credit: iQOO
Global Direct Drive Power Supply 2.0 सह फोन बॅटरी संरक्षण वाढवतो, गेमिंग, व्हिडिओ, नेव्हिगेशन सत्रांना जास्त वेळ चालवतो
iQOO आता त्यांचा आगामी नवा स्मार्टफोन बाजारात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. हा नवा फोन iQOO 15 असणार आहे. ज्यामध्ये दमदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सचा समावेश असण्याचा अंदाज आहे. दरम्यान कंपनी कडून या स्मार्टफोन सोबतच iQOO Pad 5e देखील लॉन्च करणार आहेत. कंपनीने फोनच्या लॉन्चपूर्वी आगामी फोनबद्दल महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यामध्ये फोनचं डिझाईन, डिस्प्ले, कूलिंग़ सिस्टिम आणि काही गेमिंग फीचर्सची माहिती देण्यात आली आहे.
iQOO 15 हा स्मार्टफोन चीनमध्ये 20 ऑक्टोबरला लॉन्च होणार आहे. त्यासोबत iQOO Pad 5e, iQOO Watch GT 2 आणि iQOO TWS 5 earphones देखील लॉन्च होणार आहेत. iQOO 15 मधील प्रामुख्याने समोर आलेलं फीचर म्हणजे त्यामधील 8K Vapour Chamber (VC) Ice Dome cooling system.
iQOO च्या माहितीनुसार, पहिल्यांदाच अशाप्रकारे स्मार्टफोनमध्ये VC cooling solution देण्यात आले आहे. ही कूलिंग सिस्टम डबल लेयर असणार आहे.ज्यामध्ये ultra-thin thermal conductivity graphite असेल आणि 47% फोनचा cooling performance देण्यास मदत होणार आहे. iQOO च्या प्रोडक्ट मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार, iQOO 15 मधील हीट सिंक, जो आयफोन 17 प्रो मॅक्स पेक्षा तिप्पट मोठा असणार आहे.
iQOO 15 वायरलेस चार्जिंगसह 7000mAh बॅटरी क्षमतेसह लाँच होऊ शकतो. धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी या फोनला IP69 रेटिंग असण्याचा अंदाज आहे. iQOO 15 मध्ये Warhammer MAX ड्युअल-अॅक्सिस मोटर असेल याव्यतिरिक्त, स्मार्टफोनमध्ये वॉर ड्रम मास्टर प्रो symmetrical dual speakers देखील असतील, जे चांगले गेमिंग, व्हिडिओ आणि संगीत आउटपुट ऑफर करतील अशी अपेक्षा आहे.
iQOO 15 मध्ये क्वालकॉमची नवी चिपसेट, Snapdragon 8 Elite Gen 5 असेल, जी कंपनीच्या कस्टम Q3 गेमिंग चिप आणि QNSS इंजिनसह असेल. डिस्प्लेसाठी, यात 6.85-इंचाचा 2K 8T LTPO सॅमसंग "एव्हरेस्ट" डिस्प्ले असेल, ज्यामध्ये 144Hz रिफ्रेश रेट आणि 6,000 निट्स पीक ब्राइटनेस असेल.स्मार्टफोन 2K रिझोल्यूशनवर 144fps चा सहज परफॉर्मन्स देखील देईल. याशिवाय iQOO 15 मध्ये युनिव्हर्सल एस्पोर्ट्स नेटवर्क सिस्टम 2.0 असेल जो 23 अँटेनासह येतो.
जाहिरात
जाहिरात