iQOO 15 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल, ज्यामध्ये 50MP चा 1/1.5-इंच मुख्य सेन्सर आणि 50MP पेरिस्कोप लेन्सचा समावेश असेल.
Photo Credit: GSM Arena
आगामी iQOO 15 हा स्मार्टफोन अलिकडच्या काळात अफवांच्या धुरळ्यात सापडला आहे
iQOO 15 पुढील महिन्यात चीनमध्ये लॉन्च होण्याचा अंदाज आहे. जवळपास वर्षभरानंतर कंपनी iQOO 13 नंतर हे नवे मॉडेल आणणार आहे. लीक माहितीनुसार या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेट आणि 7,000mAh पेक्षा जास्त क्षमतेची बॅटरी असू शकते. अधिकृत लॉन्चपूर्वी कंपनीच्या एका अधिकाऱ्याने डिस्प्ले संबंधित काही माहिती दिली असून, फोनचा एक लीक झालेला लाईव्ह फोटो देखील समोर आला आहे.
iQOO प्रॉडक्ट मॅनेजर Galant V यांनी Weibo पोस्टमध्ये सांगितले की iQOO 15 मध्ये 2K Samsung Everest AMOLED डिस्प्ले (NB Plus पॅनेल) असेल. हा स्क्रीन जास्त ब्राइटनेस, रंगांची अचूकता, कॉन्ट्रास्ट, लाईट ट्रान्समिशन आणि कमी रिफ्लेक्शनसह उत्तम स्पष्टता देईल. फोनचा डिस्प्ले 6,000 निट्स ब्राइटनेस सपोर्ट करेल, जो अॅडव्हान्स्ड एमिशन मटेरियल्समुळे शक्य होणार आहे. तसेच, यामध्ये अँटी-रिफ्लेक्शन कोटिंग असेल, जे Apple iPhone 17 Pro Max सारखे असणार आहे.
iQOO Neo 15 मध्ये Qualcomm ची बाजारात येऊ घातलेली Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेट वापरली जाण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनमध्ये बाजारातील सर्वात मोठी 8K वेपर चेंबर कूलिंग सिस्टीम दिली जाईल, ज्यामुळे उष्णता नियंत्रणाची कार्यक्षमता आधीच्या मॉडेल्सपेक्षा अधिक चांगली असेल.
iQOO 15 चा कथित फोटो ऑनलाइन माध्यमातून समोर आला आहे. Anvin - X@ZionsAnvin द्वारे तो शेअर करण्यात आला आहे. यात फोनचा बॅक पॅनल दिसतो, ज्यामध्ये रेड-टू-व्हाईट ग्रेडिएंट फिनिश आणि स्मूथ कर्व्ह्ड एजेस दिसत आहेत. यावरून iQOO आपल्या पुढील फ्लॅगशिपसाठी डिझाइनमध्ये बदल करू शकते, अशी चर्चा आहे. लीकमध्ये जास्त माहिती नसली तरी यात फ्लॅट स्क्रीन आणि मागील बाजूस मोठा कॅमेरा मॉड्यूल दिसतो, ज्याभोवती LED रिंग किंवा पांढऱ्या रंगाची अॅक्सेंट रिंग असल्याचे दिसते.
iQOO 15 मध्ये Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. यात 7,000mAh+ बॅटरीसोबत 100W वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे. फोनमध्ये 16GB RAM पर्यंत आणि 1TB स्टोरेजपर्यंतची सुविधा दिली जाऊ शकते.
कॅमेऱ्याच्या बाबतीत, यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल, ज्यामध्ये 50MP चा 1/1.5-इंच मुख्य सेन्सर आणि 50MP पेरिस्कोप लेन्सचा समावेश असेल. स्मार्टफोन 6.8-इंच डिस्प्ले, अल्ट्रासॉनिक फिंगरप्रिंट सेन्सर आणि ड्युअल स्पीकर्ससह येऊ शकतो. स्मार्टफोन त्याच्या सीरीजमधील सिग्नेचर ट्रॅक (काळा) आणि लेजेंड (बहुतेक पांढरा) रंगांचा पर्याय कायम ठेवेल.
जाहिरात
जाहिरात