iQOO 15 मध्ये 6.85-इंचाचा 2K रिझोल्यूशन स्क्रीन, अल्ट्रासोनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि 7000mAh ची मोठी बॅटरी असण्याची शक्यता आहे.
Photo Credit: iQOO
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारतात iQOO 13 लाँच करण्यात आला होता
iQOO कडून त्यांचा आगामी फ्लॅगशीप स्मार्टफोन iQOO 15 च्या लॉन्चची तयारी सुरू झाली आहे. कंपनीने iQOO 15 च्या लॉन्चची पुष्टी केली आहे. पण लाँचिंगची तारीख आणि इतर महत्त्वाचे अपडेटस गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहेत. परंतु चीनमधून आलेल्या ताज्या लीक्सच्या माहितीनुसार, असे दिसून येते की चाहत्यांना अपेक्षेपेक्षा थोडा जास्त वेळ वाट पहावी लागू शकते. पूर्वीच्या अंदांजांमध्ये सप्टेंबरमध्ये लाँच होण्याची शक्यता होती, परंतु Qualcomm ने त्याचा पुढील-जनरेशन Snapdragon 8 Elite 2 chipset लाँच केल्यानंतर लगेचच, नवीन अहवाल सूचित करतात की अधिकृत डेब्यू ऑक्टोबरमध्ये पुढे ढकलला जाऊ शकतो.
लीक्सवरून समोर आलेल्या माहितीनुसार, असेही सूचित होते की येणाऱ्या स्मार्टफोन मध्ये हाय एंड सॅमसंग डिस्प्ले आणि कामगिरी वाढवण्यासाठी विवो-विकसित गेमिंग चिप असेल. iQOO 15 बद्दल तुम्हाला जे काही माहित असणे आवश्यक आहे ते येथे आहे.
रिपोर्ट्सनुसार, iQOO 15 हा मागील वर्षीच्या iQOO 13 च्या लॉन्च टाईमलाईन नुसार, चीन मध्ये ऑक्टोबर आणि भारतामध्ये डिसेंबर मध्ये येण्याचा अंदाज आहे. मात्र अजूनही लॉन्च कधी होणार याची माहिती देण्यात आलेली नाही. ChinaJoy 2025 5v5 Honour of Kings गेमिंग स्पर्धेतही या हँडसेटचा उल्लेख करण्यात आला होता, जिथे विजेत्यांना सार्वजनिक प्रकाशनापूर्वी हे डिव्हाइस वापरून पाहण्याची संधी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
दरम्यान, iQOO ने आगामी लाँचबद्दल संकेत देण्यास सुरुवात केली आहे. अलीकडेच, एका गेमिंग लाईव्हस्ट्रीम दरम्यान, iQOO चे उत्पादन व्यवस्थापक Galan V यांनी Weibo वर अभिनेत्री Zhao Lusi चे iQOO 11s वापरतानाचे फोटो पोस्ट केले आणि विनोदाने तिला आगामी iQOO 15 पाठवावे असे सुचवले.
iQOO 15 मध्ये हाय एंड सॅमसंग डिस्प्ले, नवीन गेमिंग ऑप्टिमायझेशन आणि सर्वात शक्तिशाली चिप्स मिळण्याची शक्यता आहे. हे 2025 च्या सर्वात अपेक्षित अँड्रॉइड फ्लॅगशिपपैकी एक असण्याची अपेक्षा आहे. आगामी हँडसेटमध्ये 6.85-इंचाचा 2K रिझोल्यूशन स्क्रीन, अल्ट्रासोनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि 7000mAh ची मोठी बॅटरी असण्याची शक्यता आहे. Qualcomm च्या Snapdragon 8 Elite 2 processor वर चालणाऱ्या पहिल्या उपकरणांपैकी हा एक असण्याची शक्यता आहे.
पुढील महिन्यात किंवा ऑक्टोबरमध्ये चीनमध्ये iQOO 15 अधिकृतपणे लाँच होण्याची शक्यता आहे. भारतात लाँचिंग नंतरच्या तारखेला होऊ शकते आणि त्याची किंमत 59,999 रुपयांपेक्षा कमी असू शकते. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये चीनमध्ये iQOO 13 ची घोषणा करण्यात आली होती आणि नंतर डिसेंबरमध्ये 12GB RAM + 256GB स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलची किंमत 54,999 रुपये होती.
जाहिरात
जाहिरात