iQoo या स्मार्टफोन कंपनीचा आगामी स्मार्टफोन म्हणजेच IQoo 13 हा सध्या स्मार्टफोनच्या बाजारात धुमाकूळ घालत आहे. हा स्मार्टफोन अजून कंपनीकडून लॉन्च सुध्दा करण्यात आलेला नसून याबाबत काही माहिती समोर आलेली आहे. ज्यावर आधारित आजच्या या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत, iQoo 13 या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये आणि बरेच काही.
iQoo 13 ची डिझाइन आणि लॉन्च होण्याची तारीख.
Tipster वरून मिळालेल्या iQoo 13 च्या माहितीनुसार या स्मार्टफोनमध्ये एक प्रभावी हार्डवेयर तर बसविण्यात आलाच आहे, पण या स्मार्टफोनचे डिझाइन हे अत्यंत आकर्षक असून चाहत्यांना अगदीच मोहून टाकण्यास देखील समर्थ आहे.
सूत्रांनुसार असे मानले जात आहे की, या स्मार्टफोनची डिझाइन ही एक अद्वितीय डिझाइन घटक असू शकते, जी चाहत्यांना फक्त आकर्षित नाही तर प्रभावित करेल. iQoo 13 हा स्मार्टफोन कदाचित ब्रँडच्या पहिल्या पिढीतील फोनमधून लाइट स्ट्रिप डिझाइन परतही आणेल. यामध्ये काचेच्या बॅक पॅनलमध्ये समाविष्ट केलेली अनुलंब पट्टी सुध्दा देण्यात येईल. त्यासोबतच दृश्यास्पद घटक सुध्दा असतील. लाइट स्ट्रिप अतिरिक्त सानुकूलनासाठी सॉफ्टवेअर वैशिष्ट्ये सोबत देखील एकत्रित आणली जाऊ शकतात. या स्मार्टफोनच्या मागच्या बाजूस चौकोनी आकाराचा कॅमेरा सेटअप बसविण्यात येणार आहे, जो या स्मार्टफोनला वेगळेच स्वरूप प्रदान करेल. हा स्मार्टफोन मागील वर्षी लॉन्च झालेल्या iQoo 12 चा उत्तराधिकारी असून ह्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात लॉन्च होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.iQoo 13 ची वैशिष्ट्ये.
Tipster वरून मिळालेल्या माहितीनुसार iQoo 13 या स्मार्टफोनचा प्रोसेसर हा Snapdragon 8 Gen 4 या चीपसेट द्वारे समर्थित असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. याचा सर्वात मोठा फायदा असा होतो की, एकाच वेळी अनेक ॲप्स वापरताना आणि गेमिंग मध्ये सुध्दा हा स्मार्टफोन सुरळीतपणे चालतो. या स्मार्टफोनचा डिस्प्ले हा 6.7 इंचाचा असून 2K रेजोल्युशन सोबत ह्यामध्ये OLED पॅनल देण्यात आला आहे. जो स्क्रीनला अगदी स्मूथपणे आणि गुळगुळीतपणे चालण्यास प्राधान्य देतो. iQoo 13 बनवताना याच्या टिकाऊपणावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले असून धूळ आणि पाण्याचा प्रतिरोध करण्यासाठी या स्मार्टफोनला IP68 रेटिंगची मान्यता देखील प्राप्त आहे.
आता पाहूया iQoo 13 या स्मार्टफोनचा कॅमेरा. ज्यामध्ये स्मार्टफोनच्या मागच्या बाजूस तीन कॅमेऱ्यांचा सेट अप देण्यात आलेला असून यामधील प्राथमिक कॅमेरा हा 50 मेगापिक्सलचा असून दुसरा कॅमेरा सुध्दा 50 मेगापिक्सलचा आहे. 2x ऑप्टिकल झूम आणि तिसरा कॅमेरा 50 मेगापिक्सल आणि टेली फोटो लेन्सच्या संचयाने बनला आहे. ह्यामध्ये सेल्फी कॅमेरा हा 16 मेगापिक्सलचा असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
iQoo 13 या स्मार्टफोनची बॅटरी ही 6000 mAh ची असून 100 वॅटच्या वायर चार्जिंगचे समर्थन करते. जी अगदी कमी वेळात चार्ज होऊन दीर्घ काळापर्यंत चालण्यास सक्षम आहे.