iQOO Neo 10 खरेदी कुठे, कधी खरेदी कराल?

iQOO Neo 10 मध्ये Snapdragon 8s Gen 4 chip, 7000mAh battery चा समावेश आहे.

iQOO Neo 10 खरेदी कुठे, कधी खरेदी कराल?

Photo Credit: iQOO

iQOO Neo 10 is offered in Inferno Red and Titanium Chrome shades

महत्वाचे मुद्दे
  • iQOO Neo 10 3 जून पासून ग्राहकांना घेता येणार
  • Inferno Red आणि Titanium Chrome या दोन रंगांमध्ये हा फोन उपलब्ध
  • प्री बूक केला आहे त्यांना कंपनीकडून 1899 रूपयांचे TWS 1e wireless
जाहिरात

iQOO Neo 10 भारतामध्ये आता विक्रीसाठी खुला आहे. ज्यांनी हा फोन प्री बूक केला आहे त्यांना आजपासून तो खरेदी करता येणार आहे. तर अन्य ग्राहकांसाठी 3 जून पासून फोन विक्रीसाठी अमेझॉन वर खुला होणार आहे. उत्तम परफॉर्मन्स, दमदार बॅटरी लाईफ आणि दर्जेदार डिस्प्ले ही या फोनची जमेची बाजू आहे. iQOO Neo 10 ची किंमत Rs 31,999 पासून सुरू होते तर Rs 40,999 पर्यंत हा फोन वेगवेगळ्या व्हेरिएंट मध्ये उपलब्ध असणार आहे. Inferno Red आणि Titanium Chrome या दोन रंगांमध्ये हा फोन उपलब्ध असेल. ज्यांनी हा फोन प्री बूक केला आहे त्यांना कंपनीकडून 1899 रूपयांचे TWS 1e wireless earphones मोफत दिले जाणार आहेत.iQOO Neo 10 मध्ये काय आहे खास?iQOO Neo 10 मध्ये Snapdragon 8s Gen 4 chip आहे. गेमिंग, मल्टीटास्किंग किंवा जास्त वापर असणार्‍यांना iQOO Neo 10 सुमारे 30,000 रुपयांच्या किमतीत सहज आणि दमदार परफॉर्मन्सचा समावेश असलेला हा उत्तम फोन आहे.

iQOO Neo 10 मध्ये 7,000mAh battery चा समावेश आहे. जे गेमिंग आणि व्हिडिओ स्ट्रीमिंग सारख्या स्क्रीन-हेवी कामांसह देखील पूर्ण दिवस आरामात चालते. दिवसभर फोनवर असलेल्या युजर्ससाठी ही जमेची बाजू आहे.6.78-inch AMOLED panel सोबत 1.5K resolution आणि 144Hz refresh rate असणार आहे.Neo 10 मध्ये प्लास्टिकची बॉडी वापरली असली तरी ती कमकुवत वाटत नाही. डिझाइन क्लिन आहे, बेझल्स कमीत कमी आहेत आणि मोठी बॅटरी असूनही ते 8.09mm इतके बारीक आहे. सुमारे 206 ग्रॅम वजनाचे असल्याने, ते दीर्घकाळ वापरण्यासाठी आरामदायी वाटते.

iQOO Neo 10 हा एक शक्तिशाली ऑलराउंडर फोन आहे जो त्याच्या सेगमेंटमध्ये उत्तम व्हॅल्यू देतो. 35,000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या श्रेणीत मजबूत कामगिरी, बॅटरी लाइफ आणि डिस्प्ले क्वॅलिटी शोधणाऱ्या युजर्ससाठी हा फोन उत्तम पर्याय आहे.

खरेदीसाठी ऑफर्स काय?

निवडक बँक कार्ड यूजर्सना iQOO Neo 10 खरेदी करताना 2,000 रुपयांची सूट देखील घेता येऊ शकते. ग्राहकांना काही निवडक प्रोडक्ट्स वर 4,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस मिळू शकतो. सहा महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट EMI चा देखील पर्याय आहे.

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Oppo K14 5G भारतात 9 मार्चला लॉन्च होणार; 7,000mAh बॅटरी आणि डिझाइनची माहिती समोर
  2. iPhone 17e भारतात लाँच; किंमत, प्री-ऑर्डर आणि फीचर्स जाणून घ्या
  3. Apple ने नवीन iPad Air सादर केला; किंमत ₹64,900 पासून सुरू
  4. Apple चा MacBook Neo लॉन्च; $599 किंमतीत A18 Pro चिपसह सर्वात स्वस्त MacBook
  5. Xiaomi 17T भारतात एप्रिल-मे मध्ये लाँच होण्याची शक्यता
  6. OpenAI चा भारतात विस्तार: मुंबई-बेंगळुरूमध्ये ऑफिस, Tata Group बरोबर AI डेटा सेंटर
  7. JioHotstar मध्ये ChatGPT Search फीचरची भर, विविध भाषांमध्ये कंटेंट शोधण्याची सोय
  8. WhatsApp चे नवे फीचर लॉन्च; ग्रुपमध्ये नवीन सदस्यांना पाहता येणार जुने मेसेज
  9. AI Impact Summit मध्ये Adobe ची मोठी घोषणा, विद्यार्थ्यांना Creative Apps फ्री
  10. भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांसाठी Google ची मोठी गुंतवणूक
© Copyright Red Pixels Ventures Limited 2026. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »