Photo Credit: iQOO
iQOO Neo 10 series चीन मध्ये नोव्हेंबर महिन्यातच लॉन्च होण्याचा अंदाज आहे. हा फोन iQOO Neo 10 आणि iQOO Neo 10 Pro या दोन व्हेरिएंट्स सह लॉन्च होण्याचा अंदाज आहे. या फोनच्या लॉन्चच्या आधी आता कंपनीने Pro model च्या प्रोसेसरची माहिती दिली आहे तर TSMC च्या फॅब्रिकेशन प्रक्रियेवर तयार केलेला, MediaTek SoC हा फ्लॅगशिप चिपसेट असल्याची माहिती दिली आहे. फोनचा रंग आणि प्री-ऑर्डर ऑफर व्यतिरिक्त, या फोनच्या सीरीजच्या लॉन्च तारखेची देखील माहिती दिली आहे.
चायनीज सोशल मीडीया प्लॅटफॉर्म Weibo वरील माहितीनुसार, iQOO ने लेटेस्ट स्मार्टफोन्स iQOO Neo 10 series,चीन मध्ये 29 नोव्हेंबर दिवशी दुपारी 4 च्या सुमारास (अंदाजे 3:30 am IST) वाजता लॉन्च होण्याचा अंदाज आहे. हा फोन काळा, ऑरेंज आणि पांढरा या तीन रंगांमध्ये उपलब्ध होण्याचा अंदाज आहे.
iQOO Neo 10 Series चे फोन प्री रिझर्व्ह करून ठेवण्यासाठी CNY 2267 किंमत आहे. भारतीय रूपयांत ही किंमत अंदाजे 26 हजार रूपये आहे. यामध्ये अधिकचे फायदे आहेत. ज्यात Bluetooth speaker, customised tempered glass, आणि चांगल्या trade-in offers चा समावेश आहे.
iQOO Neo 10 Pro फोन मध्ये MediaTek Dimensity 9400 chipset असणार आहे याची पुष्टी करण्यात आली आहे.हीच चिपसेट Vivo X200 series मध्येही आहे. या फोनच्या प्रोसेसर मध्ये 8 कोअर्स असणार आहेत. single Arm Cortex-X925 prime core असेल. 3 Arm Cortex-X4 mid-cores आणि 4 Arm Cortex-A720 efficiency cores असणार आहे. यामध्ये artificial intelligence (AI) features देखील असतील.
SoC हा independent Q2 supercomputing chip सोबत जोडलेला असणार आहे. कंपनी कडून या आगामी स्मार्टफोन मध्ये blue crystal chip technology असेल असा दावा करण्यात आला आहे तर कमी उर्जा वापरून चांगला परफॉर्मन्स दिला जाईल असं सांगण्यात आलं आहे.
मोबाईल मध्ये Blue Volt technology असणार आहे याच्या मदतीने चार्जिंग फास्ट होणार आहे. तर iQOO Neo 10 Pro मध्ये AI features असतील.
जाहिरात
जाहिरात