Photo Credit: iQOO
iQOO Neo 10 series लवकरच चीन मध्ये लॉन्च होणार आहे. सध्या या फोन बाबतचे कोणतेच स्पेसिफिकेशन अधिकृत पणे समोर आलेले नाहीत पण त्याच्याबद्दल काही अफवा समोर आल्या आहेत. iQOO Neo 10 आणि iQOO Neo 10 Pro या फोनचा त्यामध्ये समावेश आहे. दरम्यान iQOO Neo 9 आणि iQOO Neo 9 Pro, हे फोन्स चीन मध्ये डिसेंबर 2023 मध्ये आले होते. iQOO भारतामध्ये लवकरच iQOO 13 देखील येणार आहे.
iQOO Neo 10 series बाबत iQOO Neo Product Manager कडून Weibo वर पोस्ट करत त्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या लीक झालेल्या माहितीनुसार, iQOO Neo 10 series चीन मध्ये नोव्हेंबर महिन्यात येण्याची माहिती आहे. सध्या निम्मा नोव्हेंबर महिना सरला आहे. त्यामुळे महिना अखेरीपर्यंत हा फोन लॉन्च होऊ शकतो. लवकरच हा फोन लॉन्च होऊ शकतो.
बेस iQOO Neo 10 मध्ये Snapdragon 8 Gen 3 SoC,असण्याचा अंदाज आहे. तर Pro variant मध्ये MediaTek Dimensity 9400 chipset असू शकते. या फोनला 100W wired fast charging चा सपोर्ट आहे. तर फोनमध्ये 6,000mAh बॅटरी आहे आणि 1.5K flat display आहे.
iQOO Neo 10 मध्ये 50-megapixel + 8-megapixel dual-camera system असणारआहे तर optical in-screen fingerprint sensor आहे. तर iQOO Neo 10 Pro मध्ये 50-megapixel + 50-megapixel dual-camera system आणि Ultrasonic in-display fingerprint scanner सह असणार आहे. अन्य तपशीलांनुसार, iQOO Neo 10 series handsets मध्ये मेटल मिडल फ्रेम आहे. हा मागील फोनच्या तुलनेत अपग्रेड आहे. iQOO Neo 9 series मध्ये प्लॅस्टिक फ्रेम आहेत.
base iQOO Neo 9 मध्ये Snapdragon 8 Gen 2 SoC, आहे. तर iQOO Neo 9 Pro मध्ये MediaTek Dimensity 9300 chipset आहे. या हॅन्डसेट मध्ये 5,160mAh batteries आहेत आणि फोन 20W wired fast charging ला सपोर्ट करणारे आहे. या फोनमध्ये 6.78-inch AMOLED displays आणि 50-megapixel dual rear camera आहे.
जाहिरात
जाहिरात