iQOO Neo 10R चे काही स्पेसिफिकेशन आणि लॉन्च बद्दल माहिती जारी; पहा काय खास?

iQOO Neo 10R चे काही स्पेसिफिकेशन आणि लॉन्च बद्दल माहिती जारी; पहा काय खास?

Photo Credit: iQOO

iQOO Neo 10R ड्युअल-टोन कलरवेमध्ये येण्यासाठी छेडले आहे

महत्वाचे मुद्दे
  • CEO Nipun Marya यांनी लवकरच iQOO Neo 10R भारतात येणार असल्याची दिली माहि
  • "fastest smartphone in its segment" अशी जाहिरात कंपनीकडून केली जात आहे
  • फोनचा 4K 60fps video capture आणि 90fps gaming ला सपोर्ट
जाहिरात

iQOO Neo 10R भारतामध्ये लवकरच लॉन्च होण्याच्या तयारीमध्ये आहे. हा पहिला स्मार्टफोन आहे ज्यामध्ये फोन त्यांची 'R' badge सीरीज सुरू करत आहे अशी माहिती Gadgets 360 exclusive द्वारा समोर आली आहे. कंपनी कडून या फोनच्या स्पेसिफिकेशन्सपैकी काही गोष्टी समोर घेऊन आल्या आहेत. tipster कडूनही त्याची माहिती समोर येत आहे. iQOO Neo 10R, बद्दलच्या माहिती मध्ये फोन मध्ये 1.5K OLED screen, 6,400mAh battery आहे.

iQOO Neo 10R च्या लॉन्च बद्दल माहिती

X वर करण्यात आलेल्या पोस्ट नुसार, iQOO CEO Nipun Marya यांनी दिलेल्या माहितीनुसार, iQOO Neo 10R फोन लवकरच भारतामध्ये लॉन्च होण्याच्या तयारी मध्ये आहे. कंपनीच्या कम्युनिटी फोरम वर दिलेल्या माहितीनुसार, फोन मध्ये Qualcomm ची Snapdragon 8s Gen 3 chipset आहे. ही चीपसेट मागील वर्षी मार्च महिन्यात लॉन्च झाली होती.

आगामी iQOO Neo 10R हा या सेगमेंट मधील वेगवान फोन आहे. टीझर इमेज मधील फोटोनुसार फोनला ड्युअल रेअर कॅमेरा सेटअप आहे आणि two-tone design आहे. फोन बद्दलचे अधिक अपडेट्स जशी फोनची लॉन्च डेट समोर येईल तसे लवकरच मिळतील.

iQOO Neo 10R ची स्पेसिफिकेशन्स

tipster Abhishek Yadav (@yabhishekhd) च्या माहितीनुसार, फोनमध्ये 1.5K OLED TCL C8 screen आहे. 120Hz refresh rate आहे. जो गेमिंग मध्ये 144Hz पर्यंत जाऊ शकेल. या फोनमध्ये 6,400mAh battery आहे ज्याला 80W wired PD charging आहे.

Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर LPDDR5x RAM आणि UFS 4.0 स्टोरेजसह जोडला जाईल असे सांगितले आहे. फोनचा कॅमेरा हा ड्युअल रियर कॅमेरा युनिटसह सुसज्ज असण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये सोनी LYT-600 सेन्सरसह 50-मेगापिक्सेल कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आहे. फ्रंट कॅमेरा 16MP Samsung S5K3P9 सेन्सर वापरत असल्याचे सांगितले जाते.

iQOO Neo 10R वरील कनेक्टिव्हिटी फीचर्समध्ये Bluetooth 5.4, Wi-Fi 6, आणि NFC आहे. फोनची जाडी 7.98 मिमी आणि वजन 196 ग्रॅम असल्याचे सांगितले जाते.

Comments
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »