Neo 11 सिरीज चीनमध्ये सुरुवातीच्या पदार्पणानंतर सहा महिन्यांच्या आत आणि त्यानंतर काही महिन्यांनी इतर जागतिक बाजारपेठांमध्ये येण्याचा अंदाज आहे.
Photo Credit: iQOO
वेगवान, शक्तिशाली आणि स्टायलिश — iQOO Neo11 वेग आणि कामगिरीसाठी बनवले आहे.
iQOO च्या गेमिंग वर आधारित स्मार्टफोन iQOO Neo 11 आता चीन मध्ये लॉन्च होणार आहे. हा स्मार्टफोन 30 ऑक्टोबर दिवशी संध्याकाळी 7 वाजता लॉन्च केला जाईल. गेल्या वर्षी पोस्ट केलेल्या Neo 10 मध्ये 2K OLED डिस्प्ले, 7,500mAh ची मोठी बॅटरी आणि चार वेगवेगळ्या शेड्समध्ये येणारी पूर्णपणे नवीन डिझाइन यासारख्या प्रमुख फीचर्ससह लक्षणीय अपग्रेड मिळण्याची खात्री आहे. iQOO चा दावा आहे की Neo 11 हा बाजारात हाय-रिझोल्यूशन स्क्रीनसह एवढी मोठी बॅटरी असलेला एकमेव फ्लॅगशिप असेल. टीझरमध्ये निळ्या रंगाच्या फोनमध्ये फ्लोटिंग मिरर डिझाइन, मॅट मेटल मिडल फ्रेम, सॅटिन एजी ग्लास आहे. हा फोन उच्च दर्जाचा आणि टिकाऊ आहे, असे iQOO ने म्हटले आहे.
iQOO Neo 11 भारतामध्ये नेमका कधी लॉन्च होणार? याची माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान Neo series phones च्या मागील पिढ्यांप्रमाणेच,अशी अपेक्षा आहे की Neo 11 सिरीज चीनमध्ये सुरुवातीच्या पदार्पणानंतर सहा महिन्यांच्या आत आणि त्यानंतर काही महिन्यांनी इतर जागतिक बाजारपेठांमध्ये येईल.
iQOO Neo 11 च्या लॉन्चपूर्वीच iQOO ने फोनमधील हार्डवेअरची काही माहिती दिली आहे. यामध्ये 2K OLED panel सह 144Hz refresh rate असणार आहे. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Elite चा समावेश असणार आहे. रिपोर्ट्सनुसार, यामध्ये Android 16 वर चालणार्या OriginOS 6 चा समावेश असल्याची माहिती आहे. Digital Chat Station, या टीपस्टरच्या माहितीनुसार, फोनला IP68+IP69 रेटिंग असल्याने फोन धूळ, पाण्यापासून सुरक्षित आहे.
फोनमध्ये 7,500mAh बॅटरी असणार आहे पण iQOO ने अद्याप चार्जिंग स्पीडची माहिती दिलेली नाही. लीक्समधील माहितीनुसार, त्याला 100W fast charging चा सपोर्ट असण्याचा अंदाज आहे. या फोनमध्ये सिक्युरिटी साठी in-display fingerprint sensor असण्याचा देखील अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा आहे ज्यात अल्ट्रा वाईड आणि डेप्थ सेंसरचा समावेश आहे. iQOO Neo 11 हा स्मार्टफोन काळा, निळा, नारंगी आणि चंदेरी रंगामध्ये उपलब्ध असणार आहे.
दमदार पॉवर युनिट, सुंदर डिस्प्ले आणि उच्च दर्जाच्या कामगिरीसह, iQOO Neo 11 या वर्षी येणाऱ्या सर्वात पॉवर-पॅक फ्लॅगशिपपैकी एक असल्याचे दिसत आहे.
जाहिरात
जाहिरात
Assassin's Creed Shadows Launches on Nintendo Switch 2 on December 2