iQOO Neo 11 ची किंमत सुमारे 2,500 Yuan (अंदाजे रु. 31,210) असण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे हा फोन मिड ते प्रिमियम रेंज मध्ये असण्याचा अंदाज आहे.
Photo Credit: iQOO
स्नॅपड्रॅगन ८एस जेन ४ एसओसीसह आयक्यूओ निओ १० भारतात लाँच झाला
iQOO कडून आता त्यांच्या स्मार्टफोन लाईनअप मधील Neo मध्ये नवीन फोन दाखल करण्याच्या तयारीत आहेत. चीन मध्ये सध्या नव्या स्मार्टफोनच्या लॉन्चची तयारी सुरु आहे. आगामी iQOO Neo 11 हा कंपनीमध्ये त्यांच्या फ्लॅगशीप iQOO 15 खालोखाल असण्याचा अंदाज आहे. या स्मार्टफोनमध्ये Qualcomm चा Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसर असण्याचा अंदाज आहे. सध्याच्या रिपोर्ट्सनुसार, iQOO Neo 11 लवकरच लॉन्च होणार आहे. सध्या ऑनालाईन या स्मार्टफोनचे काही फीचर्स लीक झाले आहेत.
iQOO Neo 11 हा Snapdragon 8 Elite Gen 5 processor सोबत लॉन्च होण्याचा अंदाज आहे. सोबत 2K OLED display आहे. Smart Pikachu च्या माहितीनुसार, iQOO Neo 11 मध्ये 6.8-inch flat 2K OLED displayअसणार आहे. फोनमध्ये ultrasonic in-screen fingerprint sensor असण्याचा अंदाज आहे. एकूण डिझाइन पाहता हा फोन Neo series चा लूक कायम ठेवेल अशी अपेक्षा आहे, iQOO ने काही स्ट्रक्चरल सुधारणा केल्या आहेत. ज्यामध्ये अतिरिक्त ताकदीसाठी मेटल मिड-फ्रेम आणि धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP68 प्रमाणपत्र आहे.
स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Elite processor असल्याची चर्चा आहे, जो मल्टीटास्किंग आणि गेमिंगमध्ये चांगली कामगिरी करू शकतो. अहवालात असेही म्हटले आहे की या फोनमध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7,500 mAhची मोठी बॅटरी असू शकते. या फीचर्सचा उद्देश अधिक फोन वापरणार्या ग्राहकांना power efficiency आणि performance stability देणं हा आहे.
कामगिरीच्या बाबतीत, iQOO Neo 11 मध्ये iQOO चे Monster Supercore Engine समाविष्ट असल्याचे म्हटले जाते, जे iQOO 15 मध्ये देखील वापरले जाते. ही प्रणाली फोनचं तापमान व्यवस्थापित करण्यासाठी, फ्रेम दर टिकवून ठेवण्यासाठी आणि मोठे गेमिंग सेशन होत असताना सातत्यपूर्ण कामगिरी सुनिश्चित करण्यासाठी डिझाइन केलेली आहे. या हार्डवेअर कॉम्बिनेशनसह, हा स्मार्टफोन अशा यूजर्सनाही लक्ष्य करते असे दिसते जे वेग, विश्वासार्हता आणि बॅटरी लाईफला प्राधान्य देतात.
iQOO Neo 11 ची किंमत सुमारे 2,500 Yuan (अंदाजे रु. 31,210) असण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे हा फोन मिड ते प्रिमियम रेंज मध्ये असण्याचा अंदाज आहे. iQOO 15 नोव्हेंबरच्या आसपास भारतात लाँच होण्याची शक्यता आहे, पण चीनबाहेर Neo 11 कधी उपलब्ध होईल याची अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.
जाहिरात
जाहिरात