iQOO Z10 Lite 5G मध्ये पहा काय खास? किंमत 10 हजारपेक्षा कमी

iQOO Z10 Lite 5G ची विक्री भारतामध्ये 25 जून पासून सुरू होणार आहे.

iQOO Z10 Lite 5G मध्ये पहा काय खास? किंमत 10 हजारपेक्षा कमी

Photo Credit: iQOO

iQOO Z10 Lite 5G अँड्रॉइड १५-आधारित फनटच ओएस १५ वर चालतो

महत्वाचे मुद्दे
  • iQOO Z10 Lite 5G या स्मार्टफोनमध्ये 6000mAh battery चा समावेश
  • Cyber Green आणि Titanium Blue या दोन रंगांमध्ये फोन उपलब्ध असणार
  • फोनमध्ये 50 मेगापिक्सेल Sony AI मुख्य कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेल डेप्थ स
जाहिरात

iQOO कडून त्यांचा नवा बजेट 5 जी स्मार्टफोन iQOO Z10 Lite 5G लॉन्च करण्यात आला आहे. भारता मध्ये हा किफायतशीर दरामधील जबरदस्त स्मार्टफोन आहे. iQOO Z10 Lite 5G, ची विक्री भारतामध्ये 25 जून पासून Amazon India आणि iQOO e-store च्या माध्यमातून सुरू केली जाणार आहे. Cyber Green आणि Titanium Blue या दोन रंगांमध्ये फोन उपलब्ध असणार आहे.iQOO Z10 Lite 5G मध्ये काय असतील फीचर्स?iQOO Z10 Lite 5G या स्मार्टफोनमध्ये 6000mAh battery, MediaTek Dimensity 6300 5G processor आणि 6.74-inch HD+ display with a 90Hz refresh rate असणार आहे. यामध्ये IP64 rating असल्याने फोन धूळ आणि पाण्या पासून सुरक्षित राहणार आहे. फोन military-grade durability standards चा आहे. iQOO Z10 Lite 5G ची बॅटरी 1,500 चार्जिंग सायकलनंतर 80% क्षमतेची बॅटरी टिकवून ठेवते असा दावा केला जातो, जो साधारणपणे पाच वर्षांच्या नियमित वापराइतका आहे.

या फोनसोबत 15W चार्जर देखील येणार आहे. या फोनमध्ये 50 मेगापिक्सेल Sony AI मुख्य कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे, ज्यामध्ये स्पष्टता आणि कलर बॅलेन्स सुधारण्यासाठी AI-enabled image processing आहे. 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा बेसिक फोटोग्राफी आणि व्हिडिओ कॉलिंगला सपोर्ट करतो.

इतर फीचर्स मध्ये low blue light साठी TÜV Rheinland certification, Android 15 वर आधारित Funtouch OS 15 आणि AI Erase, AI Photo Enhance, आणि AI Document Mode आहे. iQOO ने या स्मार्टफोनसाठी दोन वर्षांचे Android updates आणि तीन वर्षांचे security patches देण्यास वचनबद्ध केले आहे.

iQOO Z10 Lite 5G ची किंमत काय?

iQOO Z10 Lite 5G चा 4GB+128GB variant ₹9,999 मध्ये उपलब्ध असेल. 6GB+128GB model साठी ₹10,999 मोजावे लागतील. 8GB+256GB version साठी ₹12,999 मोजावे लागतील. दरम्यान या स्मार्टफोन वर काही बॅंक ऑफर्स देखील आहेत. ज्याच्या माध्यमातून ग्राहकांना 500 रूपयांपर्यंतचे इंस्टंट डिस्काऊंट मिळणार आहे. त्यामुळे या ऑफरमध्ये फोन खरेदी करणार्‍यांना तो ₹9,499, ₹10,499,आणि ₹12,499 मध्येही मिळू शकतो.

कंपनीच्या उत्पादन धोरणाचा भाग म्हणून, Z10 Lite 5G भारतात विवोच्या ग्रेटर नोएडा येथील फॅसइलिटी सेंटर मध्ये बनवले जाईल. iQOO ग्राहकांना देशभरातील 670 हून अधिक कंपनीच्या मालकीच्या सेवा केंद्र खुली आहेत.

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. iPhone Air 2 लाँच टाइमलाइन स्पष्ट; 2026 मध्ये घोषणा होणार असल्याचा दावा
  2. Flipkart ने उघड केला Motorola Signature सिरीजचा पहिला टीझर
  3. दमदार बॅटरी, हाय रिफ्रेश रेट स्क्रीनसह OnePlus Turbo येणार, लीक फोटोंमधून मिळाले संकेत
  4. Oppo K15 Turbo Pro स्पेसिफिकेशन लीक: मोठा कॅमेरा आणि MediaTek Dimensity 9500s अपेक्षित
  5. Galaxy A07 5G सर्टिफिकेशनमधून मोठ्या बॅटरीचे संकेत, आधीच्या मॉडेलपेक्षा वाढ
  6. HMD चे बजेट DUB Earbuds लॉन्च; फीचर्स, बॅटरी लाईफ, ANC आणि किंमत पहा
  7. Xiaomi Watch 5 मध्ये EMG + ECG सेन्सर, हेल्थ ट्रॅकिंगसाठी नवे फीचर्स
  8. Samsung Galaxy S25 Ultra ची किंमत Flipkart वर घसरली; Rs 20,000 सूट, एक्सचेंज, EMI ऑफर्स
  9. OnePlus Nord 4 Amazon वर Rs. 24,000 पेक्षा कमी मध्ये खरेदी करा नवा स्मार्टफोन
  10. Oppo Find X8 Pro वर बंपर डिस्काउंट – कमी किमतीत फ्लॅगशिप फोन मिळवा
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »