रशियामध्ये लाँच केलेला फोन 7.59 मिमी जाडीचा तर भारतीय मॉडेल 7.39 मिमी जाड आहे. याचा अर्थ भारतात विकला जाणारा फोन पातळ आहे.
Photo Credit: iQOO
iQOO Z10R 5G लॉन्च, 8GB+256GB आणि 12GB+512GB व्हेरिएंट्ससह
iQOO Z10R भारतामध्ये जुलै महिन्यात लॉन्च झाला होता. आता कंपनीने पुन्हा त्यामध्ये बदल करत अपग्रेडेड स्पेसिफिकेशन्ससह नवा iQOO Z10R 5G स्मार्टफोन बाजारात लॉन्च केला आहे. हा फोन ग्लोबल मार्केट मध्ये दाखल झाला आहे. iQOO कडून हा अपग्रेडेड स्वरूपातील फोन रशियामध्ये लॉन्च केला आहे. दरम्यान ज्या वेळेस हा स्मार्टफोन भारतात मिड बजेट कॅटेगरी मध्ये आला होता तेव्हा त्याची किंमत 19,499 रूपये होती. यामध्ये 50MP ककॅरा, 5700mAh बॅटरी आणि मीडियाटेक Dimensity 7400 प्रोसेसर चा त्यामध्ये समावेश होता.
iQOO Z10R 5G रशियात 2 व्हेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. ज्यात 8GB RAM + 256GB storage व्हेरिएंटची किंमत 22,999 RUB आहे, जी अंदाजे 26,000 रुपये आहे. 12GB + 512GB व्हेरिएंटची किंमत 27,999 RUB आहे, जी अंदाजे 31,000 रुपये आहे. नवीन iQOO Z10R 5G रशियामध्ये डीप ब्लॅक आणि टायटॅनियम शाइन रंगांमध्ये उपलब्ध असेल.
iQOO Z10R 5G फोन 4nm फॅब्रिकेशनवर बनवलेल्या MediaTek Dimensity 7360-Turbo चिपसेटद्वारे सपोर्टेड आहे. भारतीय मॉडेल Dimensity 7400 ऑक्टा-कोर प्रोसेसर वर चालणार आहे. भारतीय मॉडेलमध्ये LPDDR4X रॅम आणि UFS 2.2 तंत्रज्ञानाचा समावेश असून रशियन मॉडेल हे UFS 3.1 स्टोरेजला सपोर्ट करते, जे भारतीय एडिशनपेक्षा वेगवान आहे. हा मोबाईल 6.77 इंचाच्या AMOLED स्क्रीनवर लाँच करण्यात आला आहे जो 1300 nits पीक ब्राइटनेस आणि 120 Hz रिफ्रेश रेटसह 387ppi पिक्सेल डेन्सिटी आउटपुट देतो.फोनची स्क्रीन भारतीय मॉडेलसारखीच आहे परंतु येथील फोन 1800 निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो, जो रशियन मॉडेलपेक्षा जास्त आहे.
iQOO Z10R 5G मध्ये फोटोसाठी, iQOO Z10R 5G फोन ड्युअल रियर कॅमेऱ्यांना सपोर्ट करतो. त्याच्या बॅक पॅनलमध्ये LED फ्लॅशसह 50-MP मुख्य Sony IMX882 सेन्सर आहे. हा फोन भारतात उपलब्ध असला तरी, तो 2 MP बोकेह लेन्सला देखील सपोर्ट करतो. रशियामध्ये लाँच झालेला फोन 8 MP वाइड-अँगल लेन्सला सपोर्ट करतो.
भारतात हा फोन 44W चार्जिंग सपोर्टसह आला असला तरी, रशियामध्ये लाँच केलेला नवीन फोन 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. हे लक्षात घेण्यासारखे आहे की रशियामध्ये लाँच केलेला फोन 7.59 मिमी जाड आहे, तर भारतीय मॉडेल 7.39 मिमी जाडीचा आहे. याचा अर्थ भारतात विकला जाणारा फोन पातळ आहे.
ces_story_below_text
जाहिरात
जाहिरात
Redmi Turbo 5, Redmi Turbo 5 Pro to Be Equipped With Upcoming MediaTek Dimensity Chips, Tipster Claims