itel A90 Limited Edition मध्ये 6.6-inch HD+ display आहे आणि 90Hz refresh rate support आहे
Photo Credit: itel
itel A90 Limited Edition मध्ये 5000mAh बॅटरी आहे, 10W चार्जर असून तो 15W compatible आहे
tel कडून नवं व्हेरिएंट its A90 Limited Edition समोर आला आहे. यामध्ये भारतात 128GB of internal storage चा समावेश असलेले स्मार्टफोन्स भारतात दाखल झाले आहेत. नव्या मॉडेल मध्ये आधीच्या A90 series च्या तुलनेत काही अतिरिक्त स्पेसिफिकेशन्सचा समावेश करण्यात आला आहे. फोनला अधिकचे स्टोरेज आणि अधिक लाईफ वाजवी किंमतीमध्ये देण्याचा प्रयत्न आहे.itel A90 Limited Edition 128GB ची किंमत, रंग,itel A90 Limited Edition 128GB ची किंमत भारतामध्ये 7299 रूपयांपासून सुरू होते. या फोनची विक्री रिटेल दुकानांमधून होत आहे. 100 दिवसांमध्ये ग्राहकांना मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट देखील दिली जाणार आहे. हा फोन तीन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे ज्यामध्ये Space Titanium, Starlit Black आणि Aurora Blue चा समावेश आहे. Itel A90 लिमिटेड एडिशनच्या 3GB+64GB व्हेरिएंटची किंमत 6,399 रुपये आहे, तर 4GB+64GB कॉन्फिगरेशनची किंमत 6,899 रुपये आहे.
कंपनीच्या माहितीनुसार, या फोनला IP54 रेटिंग असल्याने तो धूळ, पाणी पासून सुरक्षित असेल. A90 Limited Edition मध्ये 128GB of internal storage चा समावेश आहे. ज्यामुळे यूजर्सना अधिक फोटोज, व्हिडिओज आणि अॅप्स सेव्ह करता येणार आहेत. या फोनला MIL-STD-810H military-grade certification देखील असणार आहे. दरम्यान फोनला T7100 octa-core processor चा सपोर्ट असणार आहे. फोन 12GB of RAM (4GB + 8GB virtual) सह येणार आहे. यामुळे फोनमध्ये मल्टिटास्किंग सोप्प होणार आहे. हा फोन Android 14 (Go Edition) वर चालतो.
itel A90 Limited Edition मध्ये 6.6-inch HD+ display आहे आणि 90Hz refresh rate support आहे. या फोनमध्ये Always-On Display आणि Dynamic Bar आहे. या फीचर्समुळे युजर्स फोन अनलॉक न करता नोटिफिकेशन्स, बॅटरी स्टेटस आणि कॉलर डिटेल्स पाहू शकतात. युजर्स स्ट्रीमिंग करत असोत किंवा गेमिंग करत असोत, DTS-एन्हांस्ड साउंडसह सुधारित ऑडिओ अनुभव मिळण्याचा ब्रँडचा दावा आहे. या फोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. या डिव्हाइसमध्ये 5000mAh बॅटरी आहे आणि 10W चार्जर (15W compatible) आहे.
itel A90 Limited Edition हा Aivana 2.0 ला सपोर्ट करतो, जो इंटिलिजंट एआय असिस्टंट आहे. हा भाषांतर करणे, लोकल गॅलरीमधून फोटोंचे अर्थ लावणे, व्हॉट्सअॅप व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल लावणं आणि जटील गणितामधील प्रश्न सोडवणे यासारखी कामे हाताळण्यासाठी डिझाइन केलेला आहे.
जाहिरात
जाहिरात