Itel A50 ची किंमत ऐकून व्हाल थक्क, लवकरच भारतात होणार लॉन्च

Itel A50 या स्मार्टफोनची किंमत ही 7,000 रुपयांपासून सुरू होणार आहे, जी सर्व सामान्यांना अगदीच परवडणारी आहे.

Itel A50 ची किंमत ऐकून व्हाल थक्क, लवकरच भारतात होणार लॉन्च
महत्वाचे मुद्दे
  • Itel A50 आधीच काही निवडक वैश्विक बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहे.
  • Itel A70 भारतामध्ये जानेवारी महिन्यात लॉन्च झाला होता.
  • या स्मार्टफोन मध्ये 5,000mAh ची बॅटरी आहे.
जाहिरात
जर तुम्हाला देखील बजेट फ्रेंडली स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर सर्वात पहिला पर्याय समोर येतो, तो म्हणजे Itel. जो सध्या कार्यरत आहे त्यांच्या पुढच्या स्मार्टफोन म्हणजेच A50 स्मार्टफोनवर. जी यापूर्वी Itel च्या लॉन्च झालेल्या Itel A70 वर आधारित असणार आहे. या स्मार्टफोन मागे कंपनीचा मुख्य उद्देश्य असणार आहे तो म्हणजे हा स्मार्टफोन सर्व वर्गातील वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून देणे. चला तर मग बघूया काय आहेत या आगामी Itel A50 ची वैशिष्ट्ये आणि किंमत. 

Itel A50 ची वैशिष्ट्ये


Itel A50 जरी सध्या भारतात लॉन्च झालेला नसला तरी सुद्धा, Itel च्या अधिकृत वेबसाईटवर या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांबाबत आवश्यक ती माहिती देण्यात आलेली आहे. माहितीनुसार Itel A50 या स्मार्टफोनचा डिस्प्ले HD+ रेसोल्युशन सोबत 6.6 इंचाचा LCD पॅनल बसविण्यात आला आहे. हा स्मार्टफोन काळया, सोनेरी, निळ्या आणि हिरव्या रंगांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. ह्या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये पाहताच Itel A70 ची आठवण आल्याशिवाय राहत नाही. 

कंपनी विनामूल्य स्क्रीन रिप्लेसमेंटसह Itel A50 ऑफर करणार असून ही ऑफर स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर 100 दिवसांच्या आत वैध असणार आहे. ब्रँडचे नवीन फोन 4G किंवा 5G कनेक्टिव्हिटीला समर्थन देतील की नाही हे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. पण या स्मार्टफोनच्या किंमतीवरून अंदाज बांधता येतो की, हा एलटीई नेटवर्किंगचे समर्थन करेल. 

Itel A50 या स्मार्टफोनचा प्रोसेसर octa-core Unisoc T603 वर आधारित आहे. या स्मार्टफोनच्या मागील बाजूस फ्लॅशसह दोन कॅमेऱ्यांचा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामधील मागील प्राथमिक कॅमेरा हा आठ मेगापिक्सलचा असून सेल्फी साठी 5 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आलेला आहे. ह्या स्मार्टफोनची बॅटरी 5000 mAh ची असून उजव्या बाजूस सुरक्षा हेतू फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.

Itel A50 ची किंमत आणि लॉन्च होण्याची तारीख


Itel कंपनीकडून आगामी Itel A50 च्या किंमती बाबत कोणतीही स्पष्टता न मिळाल्याने या स्मार्टफोनचे प्रकार आणि किंमत ही 91Mobiles ह्या वेबसाइटवरून घेण्यात आली आहे. ह्या फोनची किंमत ही 7,000 रुपयांपासून सुरू होणार आहे, जी जी सर्व सामान्यांना अगदीच परवडणारी आहे. 

•    4GB रॅम + 64GB स्टोरेज, ज्याची किंमत आहे 6,299 रुपये. 
•    4GB रॅम + 128GB स्टोरेज, ज्याची किंमत आहे 6,799 रुपये.
•    4GB रॅम + 256GB स्टोरेज, ज्याची किंमत आहे 7,299 रुपये. 

Itel A50 हा स्मार्टफोन अजूनही भारतात लॉन्च झालेला नसून ह्या स्मार्टफोनची लॉन्च होण्याची तारीख सुद्धा कंपनीकडून सांगण्यात आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार हा स्मार्टफोन भारतात लवकरच लॉन्च होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Comments

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Lava Agni 4 लवकरच लाँच होणार, सर्टिफिकेशन साइटवर बॅटरी स्पेसिफिकेशन्सची माहिती
  2. Lava Probuds N33 नेकबँड भारतात लॉन्च; IPX5 रेटिंग, फास्ट चार्जिंग आणि 30dB ANC फीचर्स सोबत येणार
  3. Galaxy S26 सीरिजचा कॅमेरा होणार आणखी पॉवरफूल; कॅमेरा स्पेसिफिकेशन्सनी वाढवली उत्सुकता
  4. OnePlus 15 सीरिजसाठी OP Gaming Core टेक्नॉलॉजी लाँच; पहा काय आहे खास?
  5. iQOO Neo 11 लवकरच होणार उपलब्ध; 35K मध्ये मिळणार फ्लॅगशिप फीचर्स?
  6. Flipkart वर दिसला Realme GT 8 Pro; भारतात लवकरच करता येणार खरेदी
  7. Vivo X300 आणि X300 Pro अधिकृतपणे आला ग्लोबल मार्केटमध्ये; भारतातील लॉन्च लवकरच
  8. iQOO 15 भारतात लवकरच लॉन्च होणार; Geekbench लिस्टिंगमधून समोर आले महत्त्वाची फीचर्स
  9. Realme GT 8 Pro भारतात 20 नोव्हेंबरला लॉन्च होणार; जाणून घ्या खास फीचर्स
  10. Amazon ने भारतात लॉन्च केला Fire TV Stick 4K Select, Vega OS सह येणार खास फीचर्स
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »