Itel S25 Ultra मध्ये 50 मेगापिक्सेल प्रायमरी रेअर कॅमेरा आहे
Photo Credit: Itel
Itel S25 Ultra is said to feature a 50-megapixel primary rear camera
Itel S25 Ultra 4G लवकरच लॉन्चच्या तयारीमध्ये आहे. या फोनच्या मार्केटिंग इमेजमुळे आता फोनचे डिझाईन, स्पेसिफिकेशन, किंमती यांची माहिती समोर येत आहे. हा फोन तीन रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. Itel S25 Ultra 4G मध्ये ट्रिपल कॅमेरा युनिट आहे. हा कॅमेरा रेअर वर आणि डिस्प्ले वर होल पंच कटआऊट सह आहे. यामध्ये Unisoc T620 SoC असणार आहे. तर रॅम 8 जीबी पर्यंत आहे. Itel S25 Ultra 4G मध्ये 5,000mAh battery आहे आणि फास्ट चार्जिंग साठी 18W अॅडाप्टर आहे.
Tipster Paras Guglani (@passionategeekz) च्या माहितीनुसार, Itel S25 Ultra च्या मार्केटिंग मटेरिअल नुसार, स्पेसिफिकेशन, डिझाईनची माहिती मिळते. तर tipster च्या दाव्यानुसार, हा 4G handset भारतामध्ये 15 हजार पेक्षा कमी रूपयामध्ये उपलब्ध होणार आहे. अन्य मार्केट मध्ये $160 म्हणजेच भारतीय रूपयामध्ये 13,500 पर्यंत उपलब्ध होण्याचा अंदाज आहे.
Itel S25 Ultra हा काळा, निळा आणि टिटॅनियम रंगामध्ये उपलब्ध आहे. यामध्ये होल पंच डिस्प्ले डिझाईन आहे. यामध्ये ट्रीपल रेअर कॅमेरा हा अप्पर लेफ्ट कॉर्नरला असणार आहे. सेन्सर्सची जागा ही Samsung Galaxy S24 Ultra च्या कॅमेरा सेटअप सारखीच आहे.
लिक्स नुसार, Itel S25 Ultra मध्ये 6.78-inch 3D curved AMOLED display आहे त्यात 120Hz refresh rate आहे. तर 1,400nits peak brightness आहे. हा फोन Unisoc T620 chipset सह चालणार आहे. यामध्ये 8GB RAM आणि 256GB storage पर्यंत आहे. ऑनबोर्ड रॅम न वापरलेले स्टोरेज वापरून 16GB पर्यंत वाढवता येऊ शकते. यामध्ये 50-megapixel प्रायमरी रेअर कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ चॅट्स साठी 32 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.
Itel S25 Ultra मध्ये 5,000mAh बॅटरी आणि 18 W चार्जिंग सपोर्ट आहे. या फोनची जाडी 6.9 mm आहे तर वजन 163 ग्राम आहे. Itel S25 Ultra च्या कथित मार्केटिंग इमेज नुसार IP64-रेट केलेले बिल्ड आहेत. हा फोन 60 महिन्यांच्या fluency certificate सह देखील येऊ शकतो.
ces_story_below_text
जाहिरात
जाहिरात
Is Space Sticky? New Study Challenges Standard Dark Energy Theory
Sirai OTT Release: When, Where to Watch the Tamil Courtroom Drama Online
Wheel of Fortune India OTT Release: When, Where to Watch Akshay Kumar-Hosted Global Game Show