itel Super Guru 4G Max या फीचर फोनमध्ये 2,000mAh बॅटरी आहे आणि तो यूएसबी-सी द्वारे वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करतो.
Photo Credit: Itel
आयटेल सुपर गुरु ४जी मॅक्स ड्युअल सिम कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो
चायनीज मोबाईल फोन ब्रॅन्ड itel कडून Super Guru 4G Max हा नवा फीचर फोन भारतामध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या मध्ये बिल्ड इन artificial intelligence assistant देखील आहे. कंपनीने भारतातील पहिला AI-enabled फीचर फोन म्हणून घोषित केलेला, itel Super Guru 4G Max मध्ये एआय असिस्टंट आहे जो यूजर्सच्या व्हॉइस कमांडला प्रतिसाद देऊ शकतो आणि कॉलिंग, मेसेज वाचणे आणि अन्यही कामं करू शकतो. itel Super Guru 4G Max हा नवा फीचर फोन आता भारतात ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमातूनही खरेदीसाठी उपलब्ध आहे.
itel Super Guru 4G Max मध्ये बिल्ड ईन एआय असिस्टंट आहे. हा असिस्टंट भारतीय यूजर्सना नैसर्गिक भाषेतच प्रतिसाद देणार आहे. कंपनीच्या दाव्यानुसार या एआय असिस्टंटला हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा समजतात. हा एआय असिस्टंट विनंतीनुसार वेगवेगळे मेनू न वापरता अनेक कामे करू शकतो. यामध्ये फोन कॉल करणे,
अलार्म सेट करणे, मेसेज पाठवणे, मेसेज वाचणे, कॅमेरा उघडणे, गाणी सुरू करणं, व्हिडिओ सुरू करणं, एफएम रेडिओ चालू करणे इत्यादी कामं केली जाऊ शकतात. फोन वर आलेले मेसेजेस वाचण्यासाठी, फोन “King Voice,” वर अवलंबून आहे, एक टेक्स्ट-टू-स्पीच फीचर जे हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत संदेश मोठ्याने समजू आणि वाचू शकतो.
itel Super Guru 4G Max मध्ये 3 इंचाची स्क्रीन आहे जी कंपनीने तिच्या कॅटेगरीतील सर्वात मोठी असल्याचे म्हटले आहे. या फीचर फोनमध्ये 2,000mAh बॅटरी आहे आणि तो यूएसबी-सी द्वारे वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन 13 भारतीय भाषांना सपोर्ट करतो आणि फ्लॅश लाईटसह VGA कॅमेरा देते. कनेक्टिव्हिटीसाठी, ते dual 4G SIM slots देते आणि ब्लूटूथला देखील सपोर्ट करते.
Super Guru 4G Max मध्ये प्रीमियम ग्लास बॅक डिझाइन असल्याचे म्हटले जाते ज्यामध्ये PMMC acrylic glass चा समावेश आहे. कंपनीने म्हटले आहे की यामुळे फोनचा अनुभव तर वाढतोच पण त्याची टिकाऊपणा देखील वाढते. फोनवर तेरा महिन्यांची वॉरंटी येते आणि कंपनीने म्हटले आहे की ग्राहकांना खरेदीच्या पहिल्या 111 दिवसांत "कोणतेही प्रश्न न विचारता" मोफत रिप्लेसमेंट मिळू शकते.
itel Super Guru 4G Max ची किंमत 2099 रूपये आहे तर फोन काळा, निळा आणि शॅम्पेयन गोल्ड रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.
जाहिरात
जाहिरात