Photo Credit: Lava
Lava हा स्वदेशी मोबाईल कंपनी कडून त्यांच्या Agni series मधील पुढील स्मार्टफोन आता बाजारात येणार आहे. येत्या 4 ऑक्टोबरला Lava Agni 3 लॉन्च होणार आहे. ग्राहकांना या स्मार्टफोन मध्ये दमदार फीचर्स मिळणार आहेत. या फोन बद्दल काही फीचर्स आणि कॅमेर्याची डिझाईन्स फोनच्या टीझर मधून समोर आली होती. आता मिळालेल्या माहितीनुसार, Lava Agni 3 ची किंमत 30 हजार पेक्षा कमी असणार आहे. त्यामुळे उत्तम फीचर्स आणि स्पेसिफिकेशन सह हा स्मार्टफोन मिड रेंज स्मार्टफोनपैकी एक असणार आहे.
Lava Agni 3 मध्ये प्रायमरी डिस्प्ले हे 1.5K curved AMOLED display असेल. तर 120Hz screen refresh rate असणार आहे. तर सेकेंडरी डिस्प्ले हा 1.74-inch AMOLED screen असणार आहे. सेकेंडरी डिस्प्ले हा केवळ कॅमेरा फीचर पुरता मर्यादित नसेल तर त्याच्यासोबत अन्य कार्यक्षमता देखील असेल. त्याचा वापर कॉल्सला उत्तर देण्यासाठी, नोटिफिकेशन पाहण्यासाठी , प्लेबॅक म्युझिक कंट्रोल करण्यासाठी करता येऊ शकतो. त्यामुळे ही सारी स्पेसिफिकेशन एकत्र करून युजर्सना एक चांगला अनुभव ग्राहकांना मिळणार आहे. या स्मार्टफोन मध्ये कस्टमायझेबल Action buttonदेखील असणार आहे. हे फीचर या प्राईज सेगमेंट मधील खास फीचर असणार आहे.
Agni 3 स्मार्टफोन मध्ये triple-camera सेटअप असणार आहे. तर या स्मार्टफोन मध्ये 50-megapixel AI camera असणार आहे. तर या स्मार्टफोन मध्ये telephoto lens असणार आहे. लावा अग्नी 3 मध्ये MediaTek Dimensity 7300X processor असणार आहे. या सेंगमेंटच्या मोबाईल मध्ये हा पहिलाच असेल. कॅमेराबद्दलचे सविस्तर फीचर्स 4 ऑक्टोबरच्या लॉन्च सोहळ्यात पाहता येणार आहेत.
Lava ने भारतीय बाजारपेठेमध्ये Agni series च्या माध्यमातून आपलं खास स्थान निर्माण केले आहे. ग्राहकांचा अग्नी 1 आणि अग्नी 2 ला चांगला प्रतिसाद दिला आहे. अग्नी 2 च्या लॉन्चनंतर तो स्मार्ट फोन बाजारात सर्वात जास्त विकला गेलेला स्मार्टफोन आहे. त्यामुळे आता कंपनीला अग्नी 3 बद्दल असाच प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. अग्नी 3 स्मार्टफोन मध्ये या सेंगमेंट मधील आघाडीचे फीचर्स मिळणार आहेत.
जाहिरात
जाहिरात