Lava Agni 4 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा युनिट आणि ड्युअल एलईडी फ्लॅश युनिट आहे.
Photo Credit: Lava
Lava Agni series ने कंपनीला उच्च किंमत श्रेणीत नेले
Lava Agni 4 नोव्हेंबरच्या अखेरीस भारतात लाँच होणार आहे आणि तो Agni 3 5G चा अपग्रेड असणार आहे. हा फोन लाँच होण्यापूर्वी, लावा कंपनीने फोनच्या डिझाइन आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल टीझर समोर आणला आहे. आता, नोएडा स्थित टेक कंपनीने पुन्हा एकदा Lava Agni 4 बद्दल टीझ केले आहे. पण यावेळी, कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हा स्मार्टफोन मागील मॉडेलच्या प्लास्टिक फ्रेमपेक्षा वेगळा अॅल्युमिनियम फ्रेमसह येईल. याव्यतिरिक्त, फोनच्या ड्युअल रियर कॅमेरा सेटअपची देखील माहिती दिली आहे. Lava च्या पहिल्या 5G लाइनअप म्हणून सादर करण्यात आलेल्या Agni series ने कंपनीचे Higher Price Bands मध्ये पाऊल टाकले आणि तिच्या Flagship Range चा पाया रचला आहे.
सोशल मीडीया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये, भारतीय स्मार्टफोन निर्मात्याने खुलासा केला की आगामी Lava Agni 4 अॅल्युमिनियम फ्रेमसह येईल. टेक कंपनीने फोनची डिझाईन देखील उघड केली आहे. इमेजमध्ये Lava Agni 4 च्या उजव्या बाजूला व्हॉल्यूम कंट्रोलर आणि लॉक/अनलॉक बटण दाखवते. खास बाब म्हणजे, फोनमध्ये अॅल्युमिनियम फ्रेमच्या खालच्या उजव्या बाजूला एक नवीन बटण देखील आहे, जे कॅप्चर बटण असू शकते.
फोनची डावी बाजू स्वच्छ दिसते. Lava Agni 4 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा युनिट आणि ड्युअल एलईडी फ्लॅश युनिट आहे. याव्यतिरिक्त, कंपनीने अलीकडेच माहिती दिली आहे की Agni 4 मध्ये Curved AMOLED डिस्प्ले असेल. हा फोन झिरो ब्लोटवेयर एक्सपीरियंस देईल. कंपनी Agni 4 ग्राहकांना फ्री होम रिप्लेसमेंट सर्विस देखील देणार आहे.
अलिकडच्या एका अहवालात दिलेल्या माहितीनुसार, Lava Agni 4 मध्ये MediaTek Dimensity 8350 चिपसेट असेल आणि तो UFS 4.0 स्टोरेजसह असेल. यात 7000 mAh बॅटरी देखील असू शकते. यात 120Hz रिफ्रेश रेटसह 6.78 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. भारतात या फोनची किंमत सुमारे 25,000 ते 30,000 रुपये असण्याची अपेक्षा आहे. टिपस्टर पारस गुगलानी (@passionategeekz) यांच्या X वरील पोस्टनुसार, Lava Agni 4 ची किंमत भारतात 30 हजार रुपयांपेक्षा कमी असण्याची अपेक्षा आहे.
Lava Agni 4 हा स्मार्टफोन Lunar Mist आणि Phantom Black या दोन रंगांमध्ये उपलब्ध असण्याचा अंदाज आहे.
जाहिरात
जाहिरात
Dyson Purifier Hot+Cool HP2 De-NOx, Purifier Hot+Cool HP1 Launched in India: Price, Features