Lava Agni 4 हा हँडसेट "झिरो ब्लोटवेअर" अनुभव देतो आणि ब्रँडच्या इतर स्मार्टफोन्सप्रमाणेच मोफत होम रिप्लेसमेंट सेवा देतो असा दावा केला जातो.
Photo Credit: Lava
Lava Agni 4 मध्ये 6.67" 1.5K 120Hz डिस्प्ले अपेक्षित
Lava कडून आता त्यांच्या प्रिमियर स्मार्टफोनच्या लॉन्चच्या तयारीमध्ये आहे. Lava Agni 4 हा फोन 20 नोव्हेंबरला भारतामध्ये लॉन्च होणार आहे. कंपनीचा दावा आहे की हा स्मार्टफोन इंडियन स्मार्टफोन इंजिनियरिंगसाठी एक नवीन बेंचमार्क स्थापित करते, ज्यामध्ये एक मजबूत अॅल्युमिनियम मिश्र धातु फ्रेम आहे, हे डिझाइन फीचर सामान्यतः 50 हजार पेक्षा जास्त किंमतीच्या फोनवर दिसून येते. लाँचिंगपूर्वी, Lava ने एका प्रेस रिलीजद्वारे बहुतेक प्रमुख स्पेसिफिकेशन्स अधिकृतपणे उघड केले आहेत, फक्त बॅटरी आणि चार्जिंग तपशील समोर आलेली नाहीत.
Lava Agni 4 मध्ये 6.67 इंचाचा AMOLED डिस्प्ले असेल ज्यामध्ये 1.15 मिमी अल्ट्रा-स्लिम इक्वल बेझल असेल, जो 1.5K रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि 2400 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस देईल. बायोमेट्रिक सुरक्षेसाठी यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. फोन टिकाऊ बनवण्यात आला आहे, जो गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन, reinforced glass back आणि IP64 धूळ आणि स्प्लॅश पासून सुरक्षित आहे.
Lava Agni 4 हा स्मार्टफोन स्वच्छ, ब्लोटवेअर-मुक्त अँड्रॉइड ओएसवर चालतो आणि दीर्घकालीन विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी चार वर्षांच्या सुरक्षा पॅचसह तीन वर्षांच्या ओएस अपडेट्सचे आश्वासन देतो. Agni 4 मध्ये MediaTek Dimensity 8350 चिपसेट, 8GB LPDDR5x रॅम, 16GB of virtual RAM आणि256GB UFS 4.0 storage आहे.
इतर प्रीमियम फीचर्समध्ये कस्टमायझ करण्यायोग्य अॅक्शन की, ड्युअल स्पीकर्स, एक्स-अॅक्सिस लिनियर व्हायब्रेशन मोटर आणि शाश्वत कामगिरीसाठी 4300mm² VC लिक्विड कूलिंग सिस्टम यांचा समावेश आहे. अहवाल असे सूचित करतात की Agni 4 मध्ये 7,000mAh बॅटरी असेल, जी Lava deviceवर आतापर्यंतची सर्वात मोठी बॅटरी असेल, ज्याला 66 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल.
20 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता (IST) भारतात Lava Agni 4 लाँच होत आहे. लाँच झाल्यानंतर, हा फोन अमेझॉनवरून भारतात विक्रीसाठी उपलब्ध होईल. भारतात Lava Agni 4 ची किंमत 25,000 रुपयांपेक्षा कमी असण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. हा हँडसेट "झिरो ब्लोटवेअर" अनुभव देतो आणि ब्रँडच्या इतर स्मार्टफोन्सप्रमाणेच त्याच्या यूजर्सना मोफत होम रिप्लेसमेंट सेवा देतो असा दावा केला जातो.
जाहिरात
जाहिरात