लिस्टिंग मधील माहितीनुसार या फोनमध्ये 7,000mAh बॅटरी असू शकते जी लिथियम पॉलिमर बॅटरी असल्याची माहिती देण्यात आली आहे.
                Photo Credit: Lava
Lava Agni 4 मध्ये 6.78" FHD+ 120Hz AMOLED डिस्प्ले अपेक्षित
Lava कडून आगामी Lava Agni 4 ची झलक समोर आली आहे. हा फोन नोव्हेंबर महिन्यात लॉन्च होण्याचा अंदाज आहे. लावा कडून या फोनच्या टीझरद्वारा त्याची पहिली झलक समोर आणली आहे. त्यामध्ये फोनचा रिडिझाईन केलेला बॅक पॅनल समोर आला आहे. या फोनमध्ये त्याच्या आधीच्या फोनप्रमाणे Agni 3 प्रमाणे यात secondary display नसेल याची पुष्टी झाली आहे.Lava च्या अधिकृत X अकाऊंटवर पोस्ट केलेल्या नवीन टीझरमध्ये आगामी Lava Agni 4 चा मागील पॅनेल दिसून येतो. ब्रँडने "प्रिसिजन इन सिमेट्री" या टॅगलाइनसह एक टीझर इमेज पोस्ट केली आहे. टीझर इमेजमध्ये असे दिसून आले आहे की फोनच्या मागील बाजूस एक आडवा कॅमेरा बार आहे, ज्यामध्ये दोन कॅमेरा सेन्सर आहेत, एक ड्युअल-एलईडी फ्लॅश आहे आणि मध्यभागी Agni ब्रँडिंग आहे. ही नवीन डिझाइन डिव्हाइसच्या पूर्वी लीक झालेल्या फोटोंशी जुळते, ज्यामुळे मागील बाजूस डिस्प्ले नसल्याची पुष्टी होते.
टीझर व्यतिरिक्त, मॉडेल क्रमांक LBP1071A असलेल्या नवीन lithium-ion बॅटरीला अलीकडेच Nemko प्रमाणपत्र मिळाले आहे आणि ते Agni 4 मध्ये असल्याचे मानले जाते. या यादीत सामान्य बॅटरी क्षमता 7,050mAh असल्याचे दिसून येते, ज्यामुळे Agni 4 मध्ये 7,000mAh बॅटरी असण्याचा दावा करणाऱ्या पूर्वीच्या लीक्सना पुष्टी मिळते. जर हे खरे असेल, तर इतक्या मोठ्या बॅटरीसह येणारा हा लावाचा पहिला स्मार्टफोन असेल.
आधीच्या अहवालांनुसार, Lava Agni 4 मध्ये 6.78 इंचाचा AMOLED डिस्प्ले Full HD+ resolution आणि 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट असण्याची चर्चा आहे, जो एक स्मुथ आणि वायब्रंड अनुभव देतो. हा फोन MediaTek Dimensity 8350 chipset द्वारे सपोर्टेड असण्याची अपेक्षा आहे जो UFS 4.0 स्टोरेजसह जोडलेला आहे, जो फ्लॅगशिप लेव्हलची कामगिरी करतो.
फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये ड्युअल 50 मेगापिक्सेल रिअर कॅमेरे असण्याची शक्यता आहे, अद्याप फ्रंट कॅमेरा सेटअप आणि जलद चार्जिंग टेक्नॉलॉजीबद्दल तपशील अद्याप गुलदस्त्यात आहेत. अलिकडच्या एका टीझरमध्ये असेही सांगण्यात आले आहे की फोनमध्ये मेटल मिडल फ्रेम असेल, ज्यामुळे त्याची एकूण बिल्ड क्वॅलिटी वाढेल.
Lava ने अद्याप Agni 4 च्या अधिकृत लाँचिंग तारखेची घोषणा केलेली नाही. मात्र रिपोर्ट्सनुसार, कंपनी पुढील आठवड्यात अधिकृत लाँचिंगची घोषणा करण्याची अपेक्षा आहे.
जाहिरात
जाहिरात
                            
                            
                                Samsung Galaxy S26 Series Price Hike Likely Due to Rising Price of Key Components: Report