Lava Blaze AMOLED 2 5G मध्ये फुल-एचडी+ रिझोल्यूशनसह 6.67-इंचाचा AMOLED डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट असण्या चा अंदाज आहे.
Photo Credit: Lava
लावा ब्लेझ एमोलेड २ ५जी मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असेल
Lava आता नवा आणि किफायतशीर 5जी स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीमध्ये आहे. या स्मार्टफोनमध्ये Blaze AMOLED 2,चा समावेश असून लवकरच तो भारतामध्ये येणार आहे. कंपनीकडून नुकतेच त्याचे तपशील सोशल मीडीया हॅन्डेल वर शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये फोनचं डिझाईन आणि टेक्निकल फीचर्स समोर आले आहेत. पोस्टमध्ये जे फोटोज आहेत त्यानुसार फोन पांढऱ्या रंगात आहे आणि मागील पॅनेलला सपाट दाखवण्यात आले आहे. Lava ब्रँडिंग फोनच्या खाली डावीकडे दिसते, तर कॅमेरा मॉड्यूल मागील पॅनेलच्या वरच्या बाजूला आहे. Lava ने म्हटले आहे की हा डिव्हाइस त्याच्या किंमतीच्या श्रेणीतील सर्वात slimmest फोन असेल.
Lava Blaze AMOLED 2 ची लॉन्च डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र इंडस्ट्री मधील सूत्रांच्या माहितीनुसार, Lava Blaze AMOLED 2 5G हा लवकरच भारतामध्येही लॉन्च होण्याचा अंदाज आहे. यापूर्वी हा फोन Lava Blaze AMOLED 2 5G मॉडेल सह जुलै महिन्यात लॉन्च होण्याचा अंदाज होता.
Lava Blaze AMOLED 2 हा फेदर व्हाईट आणि मिड्नाईट ब्लॅक अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. या फोनच्या रेअर पॅनेल वर आयताकृती कॅमेरा मॉड्युल आहे. यामध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. फोनला LED flash आहे. Lava ने मागच्या बाजूस मार्बल फिनिश वापरला आहे, जो फोनच्या लूकला वेगळेपणा देतो. त्याच्या अंदाजित किंमती आणि फीचर्सच्या घोषणांनुसार,हा फोन 15 हजार रुपयांच्या किंमतीच्या श्रेणीत येण्याची अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त, लावाचा दावा आहे की ते यूजर्ससाठी घरपोच सेवा देईल, विक्रीनंतरचा सपोर्ट वाढवण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला जाऊ शकतो.
आधीच्या अहवालांनुसार, Lava Blaze AMOLED 2 5G मध्ये फुल-एचडी+ रिझोल्यूशनसह 6.67-इंचाचा AMOLED डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट असण्या चा अंदाज आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 7050 processor असून तो 6GB LPDDR5 रॅमसह जोडलेला असेल, तसेच अतिरिक्त 6GB व्हर्च्युअल रॅम असेल. फोनमध्ये 128GB UFS 3.1 अंतर्गत स्टोरेज असेल. कॅमेरा डिपार्टमेंट मध्ये, यात ड्युअल रियर सेटअप असण्याची अपेक्षा आहे ज्यामध्ये 50MP सोनी सेन्सरसह अनेक AI फीचर्स असतील.
फोनमध्ये 5,000mAh battery असण्याची शक्यता आहे ज्यामध्ये USB Type-C port द्वारे 33W fast charging असेल. हे डिव्हाइस Android 15 वर चालेल आणि त्यात क्लिअर इंटरफेस असेल ज्यामध्ये कोणतेही प्री-इंस्टॉल केलेले थर्ड-पार्टी अॅप्स किंवा ब्लोटवेअर नसतील.
जाहिरात
जाहिरात