Lava Blaze AMOLED 2 हा Blaze Dragon सोबत लाँच होण्याचा अंदाज आहे. हे मॉडेल Lava Blaze AMOLED 5G ची जागा घेईल अशी अपेक्षा आहे, जे सध्या MediaTek Dimensity 6300 chipset देते.
Photo Credit: Lava
लावा ब्लेझ ड्रॅगन ५जी गोल्डन मिस्ट आणि मिडनाईट मिस्ट शेड्समध्ये येईल
Lava Blaze Dragon 5G भारतीय बाजारपेठेमध्ये 25 जुलै दिवशी येणार आहे. लॉन्चच्या आधी कंपनीने त्यांच्या आगामी स्मार्टफोनचे डिझाईन, रंगांचे पर्याय आणी लेटेस्ट फीचर्स समोर आणले आहेत. या स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. या स्मार्टफोन मध्ये 50 मेगा पिक्सल ड्युअल रेअर कॅमेरा युनिटचा समावेश आहे. तर 5000mAh बॅटरी आहे. फोनमध्ये Snapdragon 4 Gen 2 चिपसेट असणार आहे. Lava ने यापूर्वी जुलैमध्ये Blaze AMOLED 2 हँडसेट लाँच करणार असल्याचे सांगितले होते, परंतु अद्याप त्याची नेमकी तारीख जाहीर केलेली नाही.भारतात Lava Blaze Dragon 5G ची किंमत आणि रंगांचे पर्याय,अमेझॉन मायक्रोसाइटनुसार, भारतात Lava Blaze Dragon 5G ची किंमत दहा हजार रुपयांपेक्षा कमी असेल. हा फोन गोल्डन मिस्ट आणि मिडनाईट मिस्ट रंग पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. भारतात तो 25 जुलै रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजता लाँच होईल. दरम्यान एका प्रमोशनल पोस्टरमध्ये हँडसेटची सुरुवातीची किंमत "रु. X,999" अशी दाखवण्यात आली होती.
Amazon microsite च्या माहितीनुसार, Lava Blaze Dragon 5G मध्ये Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर असेल जो 4GB LPDDR4x रॅम आणि 128GB UFS 3.1 ऑनबोर्ड स्टोरेज सोबत जोडलेला असेल. फोन 4GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम विस्ताराला देखील सपोर्ट करेल. हा स्टॉक Android 15आउट-ऑफ-द-बॉक्सवर चालेल.
Lava Blaze Dragon 5G मध्ये 6.74- इंचाचा एचडी+ (720×1,612 पिक्सेल) 2.5D डिस्प्ले असेल ज्याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्झ, 450 निट्स पेक्षा जास्त ब्राइटनेस आणि 20:9 आस्पेक्ट रेशो असेल. पॅनेलमध्ये स्लिम बेझल्स, थोडी जाड चीन आणि वरच्या बाजूला मध्यभागी वॉटरड्रॉप-स्टाईल नॉच दिसेल. त्यामध्ये 50 मेगापिक्सेल सेन्सरसह एक ड्युअल रियर कॅमेरा युनिट देखील असेल. फोनमध्ये सेल्फीसाठी, 8MP चा फ्रंट कॅमेरा असण्याची शक्यता आहे.
Lava आगामी Blaze Dragon 5G हँडसेटमध्ये 5000mAh बॅटरी देईल जी USB Type-C port द्वारे 18W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करेल. सुरक्षेसाठी, हँडसेटमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर असणार आहे.
leakster Pratik Tandon ने यापूर्वीच दिलेल्या माहितीनुसार, Lava Blaze Dragon हा दोन कॉन्फ्युगरेशन मध्ये येण्याचा अंदाज आहे. ज्यात 4GB RAM सोबत 128GB storage आणि 6GB RAM सोबत 128GB storage चा समावेश असणार आहे.
जाहिरात
जाहिरात