फोनमध्ये 50MP sensor सोबत AI capabilities आहेत सोबतच सेल्फी साठी 8MP front camera देखील आहे.
Photo Credit: Lava
लावा ब्लेझ ड्रॅगनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा युनिट असेल
Lava ने त्यांचा आगामी स्मार्टफोन Lava Blaze Dragon smartphone भारतामध्ये 25 जुलै दिवशी लॉन्च होणार असल्याची घोषणा केली आहे. या फोनसोबतच लावा कंपनी Lava Blaze AMOLED 2 देखील याच महिन्यात लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. अद्याप Lava Blaze AMOLED 2 ची लॉन्च डेट जाहीर करण्यात आलेली नाही. Lava Blaze Dragon चं डिझाईन आणि सेल्सचे तपशील समोर आले आहेत. ब्लेझ ड्रॅगन मॉडेलच्या लीक झालेल्या डिझाइन रेंडरमध्ये इंद्रधनुष्याच्या रंगाचा रियर कॅमेरा मॉड्यूल दिसतो. जाणून घ्या आता लावाच्या Lava Blaze Dragon मध्ये काय खास असणार आहे? त्याची किंमत काय असेल?Lava Blaze Dragon ची लॉन्च डेट, उपलब्धता आणि अन्य फीचर्स,Lava Blaze Dragon ची विक्री भारतामध्ये 25 जुलै पासून सुरू होणार आहे. या दिवशी दुपारी 12 वाजता फोन लॉन्च केला जाणार आहे. अशी माहिती Amazon microsite च्या माध्यमातून देण्यात आली आहे. त्यामुळे हा फोन आता अमेझॉन ई कॉमर्स साईट वर विक्रीसाठी खुला असण्याचे संकेत मिळत आहेत.
Lava Blaze Dragon गोल्ड रंगामध्ये दिसला आहे. त्यामध्ये rectangular dual rear camera setup आहे. फोन मधील मुख्य कॅमेरा हा 50MP sensorसह असण्याचा अंदाज आहे. त्यासोबत AI capabilities देण्यात आल्या आहेत. फोनमध्ये सेल्फी साठी 8MP front camera देण्यात आला आहे. कॅमेरा सेटअपमध्ये pill-shaped LED flash unit असल्याचे दिसून येते.
Tipster Mukul Sharma कडून सोशल मीडीयात या फोनची लाईव्ह झलक दाखवण्यात आली आहे. त्या वेळी फोन काळ्या रंगामध्ये दिसत आहे. फोनचा रेअर कॅमेरा मॉड्युल rainbow-colored आहे. या फोनमध्ये Snapdragon 4 Gen 2 processor आहे. तर 128GB of UFS 3.1 storage चा समावेश आहे. या फोनमध्ये Android 15 ची ऑपरेटिंग सिस्टिम आहे. शिवाय, लीकस्टर प्रतीक टंडन च्या माहितीनुसार, Lava Blaze Dragon कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध असेल. 4GB RAM आणि 128GB स्टोरेज आणि 6GB RAM आणि 128GB स्टोरेज मध्ये तो उपलब्ध आहे. या डिव्हाइसमध्ये 18W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी असण्याची अपेक्षा आहे. सोशल मीडीयात पोस्टमध्ये दाखवलेल्या हँडसेटच्या फोटोत स्पीकर ग्रिल्स, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि 3.5 मिमी ऑडिओ जॅकसह bottom edge दिसतो.
टिपस्टर अभिषेक यादव (@yabhishekhd) ने एका X पोस्टमध्ये केलेल्या दाव्यानुसार आगामी Lava Blaze Dragon ची किंमत भारतात दहा हजार रुपयांपेक्षा कमी असू शकते.
जाहिरात
जाहिरात