Photo Credit: Lava
Lava Blaze Duo लवकरच भारतामध्ये लॉन्च होणार आहे. कंपनी कडून फोनची लॉन्च डेट, डिझाईन आणि महत्त्वाचे फीचर्स समोर आले आहेत. या फोनचे रंग देखील समोर आले आहेत. फोनच्या रॅम व्हेरिएंट सह महत्त्वाचा डिस्प्ले, कॅमेरा, चीपसेट, बॅटरी आणि ओएस डिटेल्स देखील समोर आले आहेत. फोनच्या रेअर पॅनेल मध्ये सेकंडरी डिस्प्ले आहे. या फोनचं डिझाईन देखील Lava Agni 3 मॉडेल प्रमाणे आहे. हा फोन भारतामध्ये ऑक्टोबर महिन्यात लॉन्च झाला होता.
Lava Blaze Duo भारतामध्ये 16 डिसेंबरला दुपारी 12 वाजता लॉन्च होणार आहे. अमेझॉनच्या मायक्रोसाईट वरून त्याची माहिती मिळाली आहे. हा फोन ई कॉमर्स साईट वर खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. हा स्मार्टफोन Arctic White आणि Celestial Blue या दोन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.
Lava Blaze Duo चं डिझाईन पाहता त्यामध्ये ड्युअल डिस्प्ले आहे. यामध्ये लहान, आयताकृती सेकंडरी स्क्रीन रेअर पॅनल वर आहे. अशाच प्रकारचं डिझाईन Lava Agni 3 मध्ये आ हे. त्यामध्ये 1.74-inch AMOLED touchscreen आहे. 6.78-inch 120Hz 1.5K main AMOLED display आहे.
Lava Blaze Duo मध्ये 6.67-inch 3D curved AMOLED main display आहे. 120Hz refresh rate आहे. फोनच्या मागे 1.58-inch secondary AMOLED screen आहे. या हॅन्डसेट मध्ये MediaTek Dimensity 7025 5G chipset आहे. या फोनला 5,00,000 पेक्षा जास्त AnTuTu score आहे.
अमेझॉन लिस्टिंगच्या माहितीनुसार, Lava Blaze Duo मध्ये 6GB आणि 8GB of LPDDR5 RAM आहे. या व्हेरिएंट ला 6GB आणि 8GB व्हर्च्युअल रॅम वाढवता येते. या स्मार्टफोन मध्ये 128GB of UFS 3.1 ऑनबोर्ड स्टोरेज आहे. यामध्ये Android 15 अपग्रेड मिळणार आहे.
स्मार्टफोन मध्ये कॅमेरा पाहता 64-megapixel main rear camera sensor आहे आणि 16-megapixel selfie shooter आहे आणि फोन मध्ये 5,000mAh battery तर 33W wired fast charging support आहे. सुरक्षेचा विचार करता यामध्ये in-display fingerprint sensor आहे.
जाहिरात
जाहिरात