Lava Shark 2 मध्ये चमकदार बॅक डिझाइन असल्याचे म्हटले जाते. ज्यामध्ये वरच्या-डाव्या कोपऱ्यात चौकोनी कॅमेरा डेको आणि तळाशी लावा ब्रँडिंग आहे.
Photo Credit: Lava
लावा शार्क २ दोन रंगांमध्ये उपलब्ध असेल
Lava Shark 2 लवकरच भारतामध्ये लॉन्च होणार आहे. हा स्मार्टफोन Lava Shark 5G चा उत्तराधिकारी म्हणून लॉन्च होणार आहे. दरम्यान Lava Shark 2 हा फोन बाजारात दाखल होण्यापूर्वी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार तो फोन केवळ दोनच रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. या फोनच्या डिझाईन बद्दलची माहिती देखील कंपनीकडून देण्यात आली आहे. Lava Shark 2 मध्ये चमकदार बॅक डिझाइनसह कॅमेरा डेकोरेशन असल्याचे दाखवण्यात आले आहे जे Lava च्या लाइनअपमधील दुसऱ्या स्मार्टफोन, Bold N1 Pro 5G सारखे दिसते आहे.
सोशल मीडीया प्लॅटफॉर्म X (पूर्वीच्या ट्वीटर) वरील पोस्ट नुसार, Lava Mobiles च्या माहितीमध्ये Lava Shark 2 हा फोन काळा आणि चंदेरी रंगामध्ये उपलब्ध असणार आहे. दरम्यान त्यांची अधिकृत नावंदेखील जाहीर करण्यात आलेली नाही. फोनची फ्रेम मागील पॅनलच्या रंगाशी जुळलेली दिसते. Lava Shark 2 मध्ये चमकदार बॅक डिझाइन असल्याचे म्हटले जाते, ज्यामध्ये वरच्या-डाव्या कोपऱ्यात चौकोनी कॅमेरा डेको आणि तळाशी लावा ब्रँडिंग आहे. या कॅमेरा आयलंडमध्ये तीन सेन्सर्स आहेत, तसेच एक LED flash unit आहे. डेकोच्या आत मजकूर आहे, ज्यावर "50MP AI Camera" असे लिहिले आहे. Lava कंपनीने यापूर्वी पुष्टी केली होती की आगामी Lava Shark 2 मध्ये 50-मेगापिक्सेल एआय-एनहान्स्ड ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल.
टीझर इमेजनुसार, येणाऱ्या हँडसेटच्या डाव्या बाजूला सिम ट्रेसाठी स्लॉट असल्याचे दिसते, तर पॉवर आणि व्हॉल्यूम बटणे उजव्या बाजूला आहेत. मागील टीझरमध्ये स्पीकर ग्रिल, 3.5 मिमी हेडफोन जॅक आणि तळाशी यूएसबी टाइप-सी पोर्ट असल्याची देखील पुष्टी केली आहे.
Lava Shark 2 मध्ये त्याच्या आधीच्या मॉडेलच्या फीचर्सवर आधारित काम करण्याची अपेक्षा आहे. Lava Shark 5G मध्ये 6.75-इंचाचा एचडी+ स्क्रीन आहे ज्याचा रिफ्रेश रेट 90 हर्ट्झ आहे. हँडसेटमध्ये Unisoc T765 SoC आहे, 4 जीबी रॅम आणि 64 जीबी ऑनबोर्ड स्टोरेज आहे. यात 13-मेगापिक्सेलचा ड्युअल रियर कॅमेरा युनिट आणि 5-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे. लावा हँडसेटमध्ये 18 W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी आहे.
Lava Shark 2 च्या लाँचिंगची वेळ जशी जवळ येईल तसे या फोनबद्दलचे अधिक तपशील समोर येतील अशी अपेक्षा आहे. अद्याप लावा स्मार्टफोन कंपनीने त्याची लाँचिंग तारीख जाहीर केलेली नाही.
जाहिरात
जाहिरात