Lava Shark 5G ड्युअल कॅमेरा सह होणार लॉन्च; पहा फीचर्स

Lava Shark 5G ड्युअल कॅमेरा सह होणार लॉन्च; पहा फीचर्स

Photo Credit: Lava

লাভা শার্ক ৪জি (ছবিতে) ৫০ মেগাপিক্সেলের প্রাইমারি রিয়ার ক্যামেরা বহন করে

महत्वाचे मुद्दे
  • Lava Shark 5G India भारतामध्ये 23 मे दिवशी लॉन्च होणार
  • फोनमध्ये 5,000mAh battery, 18W wired charging support
  • फोनमध्ये 50-megapixel primary rear camera आहे
जाहिरात

Lava Shark 5G हा स्मार्टफोन लवकरच भारतामध्ये लॉन्च होणार आहे. कंपनीकडून फोनचे महत्त्वाचे फीचर्स आणि फोनची लॉन्च डेट याची माहिती देण्यात आली आहे. फोनची प्राईज रेंज देखील कंपनीकडून सांगण्यात आली आहे. नुकतेच फोनचे महत्त्वाचे तपशील समोर आले आहेत. Lava Shark 4G प्रमाणेच या आगामी फोनचे देखील डिझाईन असण्याचा अंदाज आहे. Lava Shark 4G स्मार्टफोन भारतामध्ये मार्च महिन्यात लॉन्च करण्यात आला आहे. फोनचं 4 जी व्हेरिएंट मध्ये Unisoc T606 SoC आहे. फोनमध्ये 5,000mAh battery, 18W wired charging support, आणि 50-megapixel primary rear camera आहे.Lava Shark 5G भारतामध्ये कधी होणार लॉन्च?Lava Shark 5G India भारतामध्ये 23 मे दिवशी लॉन्च होणार असल्याची माहिती कंपनीकडून एका प्रेस रिलीज च्या माध्यमातून देण्यात आली आहे. या फोनचा AnTuTu score हा 4,00,000 च्या वर असण्याचा अंदाज आहे. फोन LPDDR4X RAM ला सपोर्ट करतो तर फोनची किंमत भारतामध्ये 10 हजारापेक्षा कमी असण्याचा अंदाज आहे.

Lava कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, फोनमध्ये 13-megapixel AI-backed main rear camera sensor असण्याचा अंदाज आहे तर फोन मध्ये IP54 rating असल्याने तो फोन धूळ आणि पाण्याच्या स्प्लॅशपासून सुरक्षित आहे.

फोनच्या यापूर्वी लीक झालेल्या माहितीनुसार, Lava Shark 5G मध्ये ड्युअल रेअर कॅमेरा युनिट असू शकते. हा स्मार्टफोन निळ्या आणि सोनेरी रंगामध्ये उपलब्ध होऊ शकतो. फोनमध्ये गोलाकृती एलईडी फ्लॅश युनिट आहे जे कॅमेरा आयलंड मध्ये गोलाकृती डिझाईन मध्ये आहे.

Geekbench listing नुसार, Lava Shark 5G मध्ये Unisoc T765 SoC असून तो 4GB of RAM सोबत जोडलेला आहे तर हा स्मार्टफोन 64GB of onboard storage आणि Android 15 out-of-the-box वर चालतो.

Lava Shark 4G variant ची भारतामध्ये 4GB + 64GB या पर्यायाची किंमत 6999 असू शकते. स्मार्टफोनमध्ये 6.7-inch HD+ display आहे. 50-megapixel main rear camera sensor,आणि 8-megapixel selfie shooter आहे. फोनमध्ये Unisoc T606 SoC आहे तर फोनमधील बॅटरी 18W wired charging support ची आहे. या स्मार्ट फोन मध्ये IP54 dust आणि splash-resistant rating आहे.

Comments
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »