Photo Credit: Lava
Lava Yuva 4 भारतामध्ये गुरूवार ( 28 नोव्हेंबर) दिवशी लॉन्च झाला आहे. या फोनमध्ये Unisoc T606 chipset असणार आहे. या हॅन्डसेटला AnTuTu score हा 230,000पेक्षा अधिक मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. या फोनमध्ये 50-megapixel main rear camera आणि 8-megapixel selfie shooter आहे. तर फोनची बॅटरी 5,000mAh आहे.या फोनला एका बाजूला फिंगरप्रिंट सेंसर आहे. हा फोन दोन स्टोरेज ऑप्शन सह विक्रीसाठी उपलब्ध आहे. सध्या केवळ ऑफलाईन रिटेलर्स कडे हा फोन विक्रीसाठी देण्यात आला आहे. Yuva 4 हा Lava Yuva 3 चा उत्तराधिकारी आहे. जो 2024 च्या फेब्रुवारी मध्ये विक्रीसाठी खुला होता.
Lava Yuva 4 ची भारतामधील किंमत Rs. 6,999 आहे. हा फोन 4GB + 64GB व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे तर 4GB + 128GB व्हेरिएंट ची किंमत 7,499, रूपये आहे. Lava Yuva 4 हा स्मार्टफोन ग्लॉसी ब्लॅक, ग्लॉसी पर्पल आणि ग्लॉसी व्हाईट रंगांमध्ये उपलब्ध आहे.
भारतामध्ये सध्या हा स्मार्टफोन केवळ ऑफलाईन रिटेलर्स कडे विक्रीसाठी खुला आहे. Lava Yuva 4 हा एक वर्षाच्यया वॉरेंटी सह उपलब्ध झाला आहे. फ्री होम सर्व्हिसिंग आहे.
Lava Yuva 4 मध्ये 6.56-inch HD+ screen आहे तर refresh rate 90Hz आहे. फोनमध्ये Unisoc T606 SoC ही 4GB RAM आणि 128GB onboard storage सह जोडलेली आहे. हा स्मार्टफोन Android 14 वर चालणार आहे.
फोनच्या कॅमेर्याचा विचार करता तो 50-megapixel primary rear sensor आहे आणि 8-megapixel front camera sensor आहे.
Lava Yuva 4 मध्ये 5,000mAh बॅटरी आहे त्यामुळे दिवसभराच्या वापरासाठी पुरेशी आहे तर हा फोन 10W wired charging सपोर्ट असल्याने त्याला रिचार्ज करणं देखील सोप्प आहे. सुरक्षेचा विचार करता फोनमध्ये side-mounted fingerprint sensor आहे.
फोनचं डिझाईन सुबक आणि आकर्षक आहे. फोनला चकचकीत बॅक फिनिश असल्याने त्याला प्रीमियम लुक मिळाला आहे. व्यावहारिक वैशिष्ट्ये, आधुनिक डिझाइन आणि किफायतशीर असल्याने Lava Yuva 4 ला एंट्री-लेव्हल स्मार्टफोन युजर्ससाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
जाहिरात
जाहिरात