iPhone 17 च्या रंगांची चर्चा; प्रो मॉडेल्समध्ये आयफोन आता दिसणार अधिक बोल्ड कलर्स मध्ये

आयफोन प्रो मॉडेलचा orange shade च नाही तर standard variant मधील सोनेरी रंगाचा फिनिश देखील सादर करण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.

iPhone 17 च्या रंगांची चर्चा; प्रो मॉडेल्समध्ये आयफोन आता  दिसणार अधिक बोल्ड कलर्स मध्ये

Photo Credit: Apple

आयफोन १६ प्रो मॅक्स (डावीकडे) आणि आयफोन १५ प्रो मॅक्स (उजवीकडे) चे म्यूट कलर टोन

महत्वाचे मुद्दे
  • iPhone 17 सीरीजमध्ये Pro Max, Pro व Air मॉडेल असतील
  • iPhone 17 आणि 17 Air काळा, पांढरा आणि हलक्या निळ्या रंगामध्ये दिसू शकतो
  • iPhone 17 Pro मध्ये Bold Orange रंग येण्याची शक्यता
जाहिरात

Apple iPhone 17 series येत्या दोन महिन्यामध्ये लॉन्च होणार आए. या आगामी फोन सीरीज चे अपडेट्स समोर आले आहेत. या फोनचं डिझाईन लीक झाले आहे. यापूर्वी, आम्हाला iPhone 17 Pro मॉडेल्सच्या रंगांची झलक मिळाली होती ज्यात नवीन कॉपर आणि निळा रंग समाविष्ट होता. आता, एका टिपस्टरच्या माहितीनुसार, iPhone 17 मॉडेलच्या डमी युनिट्सना दोन नवीन, ताज्या रंगांमध्ये लीक केले आहे. पण फोनचं डिझाइन आयफोन 16 प्रमाणेच दिसत आहे. आता, लीकर Sonny Dickson ने एक इमेज शेअर केली आहे ज्यामध्ये संपूर्ण iPhone 17 लाइनअप दाखवला आहे. यामध्ये ज्यामध्ये बहुतेक, जर सर्व नाही तर, अपेक्षित रंग प्रकारांचा समावेश आहे.

आयफोन्सच्या पूर्वी वायरल झालेल्या फोटोंमध्ये चार प्रो रंग दिसत आहेत. ज्यामध्ये काळा, पांढरा, नेव्ही ब्लू आणि ऑरेंज रंगांचा समावेश आहे. पण पहिल्यांदाच, त्या शेड्स आयफोनवर प्रत्यक्षात कशा दिसतील याची कल्पना येत आहे.

खास म्हणजे, नेव्ही ब्लू आणि ऑरेंज दोन्ही पर्याय अॅपल त्यांच्या प्रो मॉडेल्ससाठी वापरत असलेल्या सामान्यतः म्यूट केलेल्या टोनपेक्षा (आणि टिम कुकच्या Auburn University team रंगांची आठवण करून देणाऱ्या) जास्त सॅच्युरेटेड दिसतात. प्रो लाईनमध्ये अधिक ठळक रंगांची अपेक्षा करणाऱ्या यूजर्स साठी ही आनंदाची बातमी असू शकते, कारण फोनमधील टोन अचूक आहेत असे गृहीत धरले आहे.

iPhone 17 Air बद्दल बोलायचे झाले तर, इमेजमध्ये चार रंग दाखवले आहेत: काळा, पांढरा, हलका निळा आणि हलक्या सोनेरी रंगासारखा दिसणारा रंग. नियमित iPhone 17 मॉडेल्स काळ्या, पांढर्‍या, अगदी हलक्या निळ्या आणि फिकट गुलाबी रंगात दाखवले आहेत.

Sonny Dickson चा ट्रॅक लीक्स बाबतचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे. त्यामुळे जर हे खरे ठरले, तर अॅपलने आयफोन प्रो मॉडेलचा orange shade च नाही तर standard variant मधील सोनेरी रंगाचा फिनिश देखील सादर करण्याची ही पहिलीच वेळ असेल. मागील ट्रेंडनुसार, रंग सामान्यतः higher-end models साठी राखीव असतात. पण, हा निर्णय अशा लोकांसाठी वरदान ठरू शकतो ज्यांना अधिक ठसठशीत रंग आवडतात परंतु प्रो लाइनअपमध्ये पर्याय नसल्यामुळे त्यांना नॉन-प्रो आयफोन मॉडेल्स निवडावे लागतात.

दरम्यान सप्टेंबर महिन्यामध्ये iPhone 17 सीरीज मध्ये Phone 17 Pro Max, iPhone 17 Pro, iPhone 17 Air चा समावेश असणार आहे.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Vivo च्या नव्या TWS 5 ईअरबड्समध्ये 60dB ANC, LHDC कोडेक आणि 48 तास बॅटरी
  2. Bose-ट्यून केलेले Noise Master Buds Max भारतात लॉन्च; मिळणार 60 तासांचा प्लेबॅक
  3. AI ची मज्जा अनुभवा तुमच्या स्मार्टफोनमध्ये! Nano Banana आता लोकप्रिय अ‍ॅप्समध्ये
  4. आता वेबपेज वाचायची गरज नाही; Gemini थेट देणार सारांश
  5. Redmi K90 Pro झाला Geekbench वर स्पॉट? Snapdragon 8 Elite Gen 5 Chipset सह लॉन्च होण्याचा अंदाज; पहा अपडेट्स
  6. Nothing Phone 3a चं आता येणार लाईट व्हर्जन; समोर आले स्पेसिफिकेशन्सचे लीक्स
  7. iQOO 15 मध्ये मिळणार प्रीमियम 8K VC Ice Dome कूलिंग सिस्टिम;गेमिंग अनुभव होणार अधिक मस्त
  8. Apple चा पहिला फोल्डेबल iPhone येणार परवडणार्‍या दरात? Ming-Chi Kuo यांचा खुलासा
  9. Realme GT 8 Pro नोव्हेंबर महिन्यात भारतात लॉन्च होण्याच्या तयारीत; पहा कॅमेर्‍यामध्ये मिळणारी दमदार फीचर्स काय
  10. Apple TV+ च्या नावात बदल; Brad Pitt,Kerry Condon चा F1 The Movie स्ट्रीमिंगसाठी तयार
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »