7,000mAh battery, MediaTek Helio G81 Extreme SoC वर चालणार मोटोरोलाचा नवा Moto G06 Power स्मार्टफोन; पहा फीचर्स

Moto G06 Power हा फोन Moto Gesturesला सपोर्ट करेल, ज्यामुळे यूजर्स चुटकी वाजवून कॅमेरा तर 'चॉप चॉप' अॅक्शन वापरून फ्लॅशलाइट सुरू करतील.

7,000mAh battery,  MediaTek Helio G81 Extreme SoC वर चालणार मोटोरोलाचा नवा  Moto G06 Power स्मार्टफोन; पहा फीचर्स

Photo Credit: Motorola

मोटो जी०६ पॉवरला धूळ आणि स्प्लॅश प्रतिरोधकतेसाठी आयपी६४ रेटिंग मिळेल

महत्वाचे मुद्दे
  • Moto G06 Power हा भारतात केवळ फ्लिपकार्ट वर उपलब्ध असणार
  • सप्टेंबर महिन्यात झालेल्या worldwide at IFA 2025 मध्ये या फोनची पहिली झलक
  • Moto G06 Power भारतात 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता होणार लाँच
जाहिरात

स्मार्टफोन कंपनींच्या यादीमध्ये Motorola ही अग्रगण्य कंपनींपैकी एक आहे. भारतीय बाजारपेठेमध्ये आता Moto G06 Power हा नवा स्मार्टफोन येणार आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या worldwide at IFA 2025 मध्ये या फोनची पहिली झलक समोर आली होती. Moto G06 आणि Motorola Edge 60 Neo सोबत हा पॉवरफूल व्हेरिएंट आता भारतात पदार्पणासाठी सज्ज आहे. Motorola कंपनीने आगामी हँडसेटची महत्त्वाची फीचर्स समोर आणली आहेत. दरम्यान Moto G06 Power हा भारतात केवळ फ्लिपकार्ट वर उपलब्ध असणार आहे.

Moto G06 Power चे भारतीय व्हेरिएंट मधील जाहीर झालेले फीचर्स

फ्लिपकार्टच्या लिस्टिंग वरून सध्या भारतात उपलब्ध होणार्‍या Moto G06 Power चे फीचर्स समोर आले आहेत. Moto G06 Power मध्ये 6.88-inch display आहे. तसेच fluid 120Hz refresh rate आणि durable Corning Gorilla Glass 3 protection असणार आहे. हा फोन MediaTek Helio G81 Extreme SoC वर चालणार आहे. मिड रेंज सेगमेंट मध्ये हा फोन परफॉर्मन्स आणि गेमिंग क्षमतेवर विशेष लक्ष ठेवणारा आहे. G06 Power फोनमध्ये 7,000mAh battery आहे. हा फोन लोकप्रिय Moto Gesturesला सपोर्ट करेल, ज्यामुळे यूजर्स चुटकी वाजवून कॅमेरा उघडू शकतील किंवा 'चॉप चॉप' अॅक्शन वापरून फ्लॅशलाइट सक्रिय करू शकतील.

फोटोग्राफीसाठी, फोनच्या मागील बाजूस 50 मेगापिक्सेल Quad Pixel camera आणि समोर 8-megapixelसेल्फी शूटर आहे. फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 4G VoLTE, Wi-Fi, Bluetooth 6.0, GPS, USB Type-C आणि NFC (निवडक प्रदेशांमध्ये) समाविष्ट आहेत. फोनमध्ये IP64-रेटेड डस्ट आणि स्प्लॅश-रेझिस्टंट बिल्ड आणि डॉल्बी अ‍ॅटमॉसने वाढवलेले स्टीरिओ स्पीकर्स असतील जे एक immersive audio experience साठी असतील.

ग्लोबल व्हर्जेनमध्ये 8GB of LPDDR4X RAM आणि 256GB storage, 18W wired fast charging आणि Android 15 वर आधारित Hello UI देण्यात आला आहे त्यात 3.5mm headphone jack आणि साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरचा समावेश होता.

Moto G06 Power भारतामध्ये कधी होणार लॉन्च?

Moto G06 Power भारतात 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता लाँच होणार आहे. फ्लिपकार्टवरील एका मायक्रोसाइटने या लाँच तारखेची पुष्टी केली आहे. दरम्यान हा स्मार्टफोन केवळ फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल. तसेच हा फोन निळा, हिरवा आणि राखाडी रंगांमध्ये उपलब्ध असेल. हँडसेटमध्ये व्हेगन लेदर फिनिश असेल.

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. OnePlus Nord Buds 4 Pro भारतात १९ मार्चला लॉन्च होणार
  2. Samsung Galaxy M17 5G भारतात लॉन्च; ५०MP कॅमेरा आणि ५,०००mAh बॅटरीसह दमदार फीचर्स
  3. WhatsApp अपडेट: इमोजी टाइप करताच मिळणार संबंधित स्टिकर्स, iPhone युजर्ससाठी नवीन फीचर
  4. वनप्लस 15T चे डिझाइन आणि रंग पर्याय अधिकृतपणे जाहीर; चीन लॉन्चपूर्वी फीचर्स समोर
  5. iQOO Z11 Turbo चा टीझर समोर; लवकरच लॉन्च, जबरदस्त बॅटरी आणि फास्ट चार्जिंगची शक्यता
  6. SIM Binding नियम काय आहे? मेसेजिंग अॅप्स आणि वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार
  7. Poco C85x 5G लवकरच भारतात; Flipkart मायक्रोसाइटवर डिझाइनची झलक
  8. Google Pixel 10a भारतात विक्रीसाठी उपलब्ध; 48MP कॅमेरा, 5100mAh बॅटरीसह किंमत ₹49,999
  9. Motorola Edge 70 Fusion किंमत आणि उपलब्धता
  10. Nothing Phone 4a सीरिज भारतात लॉन्च; किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाहीर
© Copyright Red Pixels Ventures Limited 2026. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »