चीनमध्ये XT2533-4 या मॉडेल नंबरसह एक नवीन मोटोरोला फोन TENAA कडून प्रमाणित झाला आहे. हा फोन मोटो G36 म्हणून लाँच होईल अशी शक्यता आहे
Moto G36 लाँच लवकरच होऊ शकतो
Moto G36 हा लवकरच बाजारात लॉन्च होण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन पुन्हा एका रेग्युलेटरच्या वेबसाईटवर दिसून आला आहे. कंपनीकडून अद्याप अधिकृत लाँच तारीख जाहीर झालेली नसली तरी, चिनी रेग्युलेटरी अथॉरिटी TENAA ने या फोनची यादी करत काही फोटोजे आणि स्पेसिफिकेशन्स शेअर केली आहेत. लिस्टिंगनुसार, या फोनमध्ये 6.72-इंचाचा डिस्प्ले आणि 6,790mAh क्षमतेची बॅटरी दिली जाईल. तसेच, 50-मेगापिक्सेलचा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आणि 32-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. हा स्मार्टफोन गेल्या वर्षीच्या मोटो G35 चा उत्तराधिकारी म्हणून बाजारात येण्याची शक्यता आहे.मोटो G36 मधील स्पेसिफिकेशन्स काय असू शकते?चीनमध्ये XT2533-4 या मॉडेल नंबरसह एक नवीन मोटोरोला फोन TENAA कडून प्रमाणित झाला आहे. हा फोन मोटो G36 म्हणून लाँच होईल अशी शक्यता आहे. लिस्टिंगनुसार, या हँडसेटमध्ये 6.72-इंच TFT डिस्प्ले असून त्याचे रिझोल्यूशन 1,080×2,400 पिक्सेल असू शकते.
मोटो G36 या हॅन्डसेटमध्ये octa core chipset असून त्याची base core frequency 2.4GHz आहे. या यादीत फोनसाठी 4GB, 8GB, 12GB, आणि 16GB RAM चा पर्याय आहे. तसेच 64GB, 128GB, 256GB, आणि 512GBस्टोरेज पर्याय आहेत.
मोटो G36 मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप असण्याचा अंदाज आहे. ज्यामध्ये 50-मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेल सेकंडरी शूटर असेल. फ्रंटसाठी 32-मेगापिक्सेल कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनमध्ये 6,790mAh बॅटरी असू शकते, जी कंपनीकडून 7,000mAh सेल म्हणून मार्केट केली जाऊ शकते. TENAA लिस्टिंगनुसार, हा हँडसेट जांभळ्या रंगात (Purple Shade) दिसून आला असून त्यामध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर मिळेल. याचे मोजमाप 166.3×76.5×8.7mm असून वजन 210 ग्रॅम आहे.
लाँच डेटबाबत मोटोरोला कडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, हा स्मार्टफोन बजेट-फ्रेंडली डिव्हाइस म्हणून बाजारात येईल अशी अपेक्षा आहे. यामध्ये मागील वर्षी डिसेंबरमध्ये भारतात ₹9,999 किंमतीत लाँच झालेल्या मोटो G35 5G पेक्षा काही अपग्रेड्स मिळण्याची शक्यता आहे.
Moto G35 5G मध्ये Corning Gorilla Glass 3 protection सह 6.72-इंचाचा फुल-एचडी+ स्क्रीन आहे. हँडसेटला Unisoc T760 SoC ने पॉवर दिली आहे, ज्यामध्ये ड्युअल रिअर कॅमेरा युनिट आहे ज्यामध्ये 50-मेगापिक्सेल क्वाड-पिक्सेल प्रायमरी रिअर सेन्सर आणि अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्ससह 8-मेगापिक्सेल सेन्सर समाविष्ट आहे. यात 16-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आणि 20W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट असलेली 5,000mAh बॅटरी आहे.
जाहिरात
जाहिरात