Moto G67 Power 5G चं हायलाईट म्हणजे त्यामध्ये 50MP Sony LYT-600 main sensor चा समावेश आहे.
 
                Photo Credit: Motorola
Moto G67 Power 5Gमध्ये MIL-810H आणि IP64 रेटेड बॉडी
Motorola कडून आगामी Moto G67 Power 5G स्मार्टफोनची घोषणा झाली आहे. मोटोरोला चा हा नवा व्हेरिएंट 5 नोव्हेंबर दिवशी दुपारी 12 वाजता बाजारामध्ये दाखल होणार आहे. सध्या या स्मार्टफोनचा टीझर फ्लिपकार्टवर लाईव्ह करण्यात आला आहे. याच्या माध्यमातूनच फोनच्या उपलब्धतेबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे. असे असले तरीही अद्याप Moto G67 Power 5G भारतामध्ये कोणत्या किंमतीमध्ये उपलब्ध असेल याची माहिती गुलदस्त्यामध्ये ठेवण्यात आली आहे.Moto G67 Power 5G ची प्रिमियम डिझाईन आणि डिस्प्ले अपडेट्स,Moto G67 मध्ये 5जी फीचर्स आहेत. यामध्ये 6.7-inch Full HD+ display आहे तर 120 Hz refresh rate आहे. त्याच्या माध्यमातून गेमर्सना अगदी स्मूथ व्ह्युज्युअल्स मिळणार आहेत. या फोनची स्क्रीन Corning Gorilla Glass 7i ने प्रोटेक्ट केली आहे. फोनची बॉडी MIL-810H military-grade defence ची आहे. यामध्ये IP64-rated frame आहे. सोबतच त्यामध्ये vegan leather backआहे.
Moto G67 मध्ये Snapdragon 7s Gen 2 processor चा समावेश आहे. त्याला 8GB of RAM आणि 128GB of storage ने जोडलेले आहे. या फोनची मेमरी व्हर्च्युअली 24GB रॅमपर्यंत वाढवता येते. हा फोन Android 15 आधारित Hello UX वर चालतो, ज्यामध्ये Android 16 update ची खात्री आहे. यात डॉल्बी अॅटमॉससह ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स देखील आहेत, त्यामुळे ते मल्टीमीडिया पॉवरहाऊस आहेत.
Moto G67 Power 5G चं हायलाईट म्हणजे त्यामध्ये 50MP Sony LYT-600 main sensor चा समावेश आहे. त्यासोबत अन्य ultrawide आणि depth cameras आहेत. फोनमध्ये फ्रंट सेल्फी आणि व्हिडिओ कॉल्स साठी 32MP front camera आहे. सार्या मॉडेल्समधील कॅमेरा 4K video recording देतो तसेच AI photo improvement features देखील देतो. या ड्राइव्हमध्ये सिलिकॉन-कार्बन तंत्रज्ञानाने चालणारी 7,000mAh बॅटरी आहे जी एका चार्जवर 58 तासांपर्यंत वापरता येऊ शकते.
मोठ्या क्षमतेच्या बॅटरीसह, एआय कॅमेरा आणि फ्लॅगशिप-ग्रेड बिल्डसह, Moto G67 Power 5G भारतातील मध्यम श्रेणीच्या स्मार्टफोन अनुभवाचे रूपांतर करण्यासाठी सज्ज आहे.
Moto G67 Power 5G हे तीन पँटोन-क्युरेटेड रंगांमध्ये समोर येण्याचा अंदाज आहे. यामध्ये निळा, हिरवा आणि जांभळा रंग समाविष्ट असू शकतो असे असले तरी अद्याप नेमकी रंगांची नावे अद्याप जाहीर केलेली नाहीत.
जाहिरात
जाहिरात
 OpenAI Upgrades Sora App With Character Cameos, Video Stitching and Leaderboard
                            
                            
                                OpenAI Upgrades Sora App With Character Cameos, Video Stitching and Leaderboard
                            
                        
                     Samsung's AI-Powered Priority Notifications Spotted in New One UI 8.5 Leak
                            
                            
                                Samsung's AI-Powered Priority Notifications Spotted in New One UI 8.5 Leak
                            
                        
                     iQOO 15 Colour Options Confirmed Ahead of November 26 India Launch: Here’s What We Know So Far
                            
                            
                                iQOO 15 Colour Options Confirmed Ahead of November 26 India Launch: Here’s What We Know So Far
                            
                        
                     Vivo X300 to Be Available in India-Exclusive Red Colourway, Tipster Claims
                            
                            
                                Vivo X300 to Be Available in India-Exclusive Red Colourway, Tipster Claims