Moto X70 Air मध्ये पॉवरफूल Snapdragon 7 Gen 4 Chipset चा समावेश आहे. तर फोनमध्ये 4,800mAh बॅटरी आहे.
Photo Credit: Lenovo
Moto X70 Air ग्रे, लिली पॅड, ब्रॉन्ज ग्रीन रंगात लॉन्च होईल
मोटोरोला कडून आगामी नव्या Moto X70 Air ची घोषणा केली अहे. हा स्मार्टफोन या महिन्याअखेरीपर्यंत चीन मध्ये लॉन्च होण्याचा अंदाज आहे. या नव्या हॅन्डसेट सह Motorola देखील बाजारपेठेमध्ये अॅपल पासून सॅमसंगच्या अल्ट्रा थीन स्मार्टफोनच्या सेगमेंटमध्ये उतरणार आहे. रिपोर्ट्सनुसार मोटोरोला चा हा आगामी स्मार्टफोन अॅपलच्या आयफोन एअर च्या आकारात म्हणजे 6 मिमी पेक्षा थोडा पातळ आहे.Moto X70 Air मध्ये पॉवरफूल Snapdragon 7 Gen 4 Chipset चा समावेश आहे. तर फोनमध्ये 4,800mAh बॅटरी आहे. Moto X70 Air हा फोन चीनी मार्केटपुरताच सीमित राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ग्लोबल मार्केट मध्ये हा फोन Motorola Edge 70 नावाने लॉन्च केला जाऊ शकतो.
Moto X70 Air सध्या चीन मध्ये Lenovo वेबसाइट वर लिस्टेड आहे पण कंपनीकडून अद्याप त्याच्या किंमतीची माहिती देण्यात आलेली नाही. हा फोन 256GB अशा स्टोरेज आणि 512 GB अशा स्टोरेजऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. हा फोन ग्रे, लीली पॅड आणि ब्रॉन्ज ग्रीन मध्ये लॉन्च करण्यात येईल असा कयास आहे. 31 ऑक्टोबरला हा फोन चीन मध्ये लॉन्च होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर 5 नोव्हेंबरला युरोपियन मार्केट मध्ये तो दाखल होईल. अन्य देशांमध्ये हा फोन Motorola Edge 70 नावाने दाखल केला जाऊ शकतो.
Moto X70 Air मध्ये 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह 6.7 इंचाचा 1.5 के pOLED डिस्प्ले आहे. या डिव्हाइसचा कमाल ब्राइटनेस 4500 निट्स पर्यंत आहे. हे SGS आय केअर प्रोटेक्शनसह देखील येते. यात IP68+ IP69 धूळ आणि पाण्याचे प्रतिरोधक रेटिंग देखील आहे. या डिव्हाइसला Snapdragon 7 Gen 4 Chipset ची ताकद आहे, जो 12GB पर्यंतLPDDR5X रॅम आणि ५१२ जीबी पर्यंत UFS 3.1 स्टोरेजसह जोडलेला आहे. या डिव्हाइसमध्ये चांगल्या उष्णताहीट डिसिपेशनसाठी 3D व्हेपर चेंबर आणि ग्राफ़िक्स-इंटेंसिव टास्क अॅड्रेनो GPU आहे. हे डिव्हाइस नवीन Android 16 वर चालते.
फोटोग्राफीसाठी, डिव्हाइसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. तुम्हाला ५०-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि ५०-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा मिळतो. सेल्फीसाठी, डिव्हाइसमध्ये ५०-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.
जाहिरात
जाहिरात