Moto X70 Air भारतात लवकरच दाखल होणार? पाहा खास फीचर्स, किंमतीचे अंदाज

Moto X70 Air सध्या प्री ऑर्डर्स साठी सज्ज असून Lenovo Mall आणि JD.com च्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

Moto X70 Air भारतात लवकरच दाखल होणार? पाहा खास फीचर्स,  किंमतीचे अंदाज

Photo Credit: Motorola

X70 Air: 5.99 मिमी जाडी, 159 ग्रॅम वजन, स्लिम डिझाइन

महत्वाचे मुद्दे
  • Moto X70 Air, Edge 70 चे रिब्रँडेड व्हर्जन
  • गॅझेट ग्रे, लिली पॅड आणि ब्रॉन्झ ग्रीन या 3 रंगांमध्ये फोन लॉन्च होणार
  • फोन Android 16 वर, Snapdragon 7 Gen 4 सह चालतो
जाहिरात

Motorola कडून चीन मध्ये 31 ऑक्टोबर दिवशी Moto X70 Air चा लॉन्च साठी सज्ज होत आहे. सध्या हा स्मार्टफोन प्री ऑर्डर्स साठी उपलब्ध होत आहे. हा स्मार्टफोन Motorola Edge 70 चे रिब्रँडेड व्हर्जन असण्याची अपेक्षा आहे, जो 5 नोव्हेंबर रोजी जागतिक स्तरावर दाखल होणार आहे. पहा या आगामी स्मार्टफोनमध्ये नेमकं काय काय असणार आहे?

Moto X70 Air सध्या प्री ऑर्डर्स साठी सज्ज असून Lenovo Mall आणि JD.com च्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 12GB + 256GB आणि 12GB + 512GB हे दोन व्हेरिएंट्स असून त्याची किंमत अनुक्रमे 2,599 Yuan (अंदाजे $365) आणि 2,599 Yuan (अंदाजे $365) आहे. हा फोन तीन पँटोन-प्रमाणित रंग पर्यायांमध्ये उपलब्ध असेल, ज्यामध्ये गॅझेट ग्रे, लिली पॅड आणि ब्रॉन्झ ग्रीन यांचा समावेश आहे.

Moto X70 Air मध्ये 1.5K रिझोल्यूशन (1,220 x 2,712 पिक्सेल), 120Hz रिफ्रेश रेट आणि प्रभावी 4,500 nits पीक ब्राइटनेससह 6.7-इंचाचा pOLED डिस्प्ले आहे. Pantone-प्रमाणित पॅनेलमध्ये SGS आय-केअर प्रोटेक्शन आणि अतिरिक्त सोयीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील समाविष्ट आहे. हा फोन Android 16 वर चालतो आणि Snapdragon 7 Gen 4 chipset द्वारे सपोर्टेड आहे, ज्यामध्ये सुरळीत मल्टीटास्किंग आणि जलद अॅप लोडिंगसाठी LPDDR5x रॅम आणि UFS 3.1 स्टोरेज आहे. तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी, मोटोरोलाने ते3D vapor chamber cooling system दिली आहे. फोनमधील बॅटरीच्या बाबतीत, फोनमध्ये 4,800mAh युनिट आहे जे 68W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते, जे वेग आणि लवचिकता दोन्ही देते.

फोटोग्राफीसाठी, Moto X70 Air मध्ये 50MP Samsung S5KGNJ प्रायमरी कॅमेरा, 50MP अल्ट्रा-वाइड लेन्स आणि सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 50MP फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, Wi-Fi, ब्लूटूथ, NFC, GPS, OTG आणि USB टाइप-C पोर्ट समाविष्ट आहेत. फोनला IP68 आणि IP69 रेटिंग देखील आहे, ज्यामुळे ते धूळ आणि पाणी दोन्हींपासून तो सुरक्षित आहे. X70 Air त्याच्या स्लिम प्रोफाइलसाठी खास आहे, हा फोन 5.99 मिमी जाडी आणि सुमारे 159 ग्रॅम वजनाचा आहे.

ग्लोबल काऊंटरपार्ट मध्ये Motorola Edge 70 युरोपमध्ये €710आणि €810 च्या किंमतीच्या श्रेणीत लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. यामुळे मोटोरोलाच्या लाइनअपमध्ये एक प्रीमियम मिड-रेंज ऑफर बनते.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Xiaomi 17 Ultra मध्ये मिळू शकतो 200MP झूम कॅमेरा आणि 50MP मुख्य सेन्सर – रिपोर्ट
  2. OnePlus 15 मध्ये मिळणार 7,300mAh ची बॅटरी, Snapdragon 8 Elite Gen 5 चा दमदार परफॉर्मन्स
  3. Moto X70 Air भारतात लवकरच दाखल होणार? पाहा खास फीचर्स, किंमतीचे अंदाज
  4. Snapdragon 8 Elite SoC आणि 165Hz डिस्प्लेसह OnePlus Ace 6 झाला अधिकृत; पहा किंमत काय?
  5. Vivo X300 सिरीज भारतात लॉन्च होणार? Zeiss टेलिफोटो एक्स्टेंडर किट्ससह येण्याची शक्यता
  6. Vivo च्या आगामी S50 सिरीजमधील मूळ फीचर्स आले समोर, नोव्हेंबर महिन्यात होणार लॉन्च
  7. HMD Fusion 2 ची लीक झाली स्पेसिफिकेशन्स; फोनमध्ये असणार Snapdragon 6s Gen 4, 120 Hz डिस्प्ले, Smart Outfits Gen 2
  8. Nothing Phone 3a Lite 5G Geekbench लीकमध्ये समोर; पहा काय आहेत फीचर्स
  9. iQOO चाहत्यांसाठी खुशखबर! 27 नोव्हेंबरला येतोय iQOO 15 दमदार फीचर्स सह
  10. OnePlus 15 आणि Ace 6 फ्लॅगशिप स्मार्टफोन च्या किंमती झाल्या लीक
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »