Motorola Razr 60 फ्लिप फोनची रचना स्लिमर बेझल्स, फूल आऊटर डिस्प्ले आणि क्रिस्टल-इन्सपायर्ड व्हॉल्यूम कीजसह जोडली गेली आहे.
Photo Credit: Motorola
मोटोरोला बड्स लूप यापूर्वी स्वारोवस्की क्रिस्टल्ससह फ्रेंच ओक फिनिशमध्ये आला होता
Motorola ने Swarovski सोबतच्या त्यांच्या नव्या fashion-focused collaboration ची अधिकृतपणे घोषणा केली आहे. फोल्डेबल लाइनअप आणि ऑडिओ अॅक्सेसरीजमध्ये यामुळे क्रिस्टल-स्टडेड ट्विस्ट आला आहे. कंपनीने Brilliant Collection नावाचा एक विशेष एडिशन बंडल सादर केला आहे, जो नवीन पँटोन आइस मेल्ट फिनिशमध्ये Razr 2025 आणि Moto Buds Loop ऑफर करतो. मोटोरोलाच्या माहितीनुसार, ग्राहकांना फ्लिप फोन कॅरी करण्यासाठी डिझाइन केलेली क्रॉसबॉडी बॅग देखील मिळणार आहे. Motorola Razr 60 हा स्मार्टफोन या वर्षाच्या सुरुवातीला भारतात MediaTek Dimensity 7400X SoC सह लाँच करण्यात आला होता.
Brilliant Collection मध्ये Razr 2025 हा मर्यादित पँटोन आइस मेल्ट फिनिशमध्ये सादर करण्यात आला आहे. त्याचा क्विल्टसारखा लेदर-इन्सपायर्ड बॅक 35 स्वारोवस्की क्रिस्टल्सने सजवलेला आहे, ज्यामध्ये हिंजवर 26 बाजू असलेले एक अचूक-कट मोठे क्रिस्टल समाविष्ट आहे. फ्लिप फोनची रचना स्लिमर बेझल्स, फूल आऊटर डिस्प्ले आणि क्रिस्टल-इन्सपायर्ड व्हॉल्यूम कीजसह जोडली गेली आहे.
फोनला अजून सुंदर करण्यासाठी मोटोरोलाने त्यामध्ये एक पारदर्शक क्रॉसबॉडी बॅग समाविष्ट आहे. 999.99 डॉलर्स किंमत (भारतीय रूपयांमध्ये 87,000) असलेला हा बंडल नियमित Razr प्रकारावर आधारित आहे, जो Dimensity 7400X चिपवर चालतो आणि सामान्यतः $599.99 मध्ये किरकोळ विक्रीसाठी उपलब्ध असतो.
रेग्युलर Motorola Razr 60 ची किंमत 49,999 रुपये आहे, ज्याचा एकमेव 8 जीबी + 256 जीबी रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशन आहे. मोटो बड्स लूप पॅन्टोन फ्रेंच ओक कलरवेसाठी $299 (अंदाजे 26,000 रुपये) किंमतीसह लाँच करण्यात आला.
Motorola Razr 60 फोनसोबतच, मोटो बड्स लूप देखील आईस मेल्टच्या रंगात दिसतात ज्यामध्ये स्वारोवस्की क्रिस्टल्स त्यांच्या लूप केलेल्या स्टेमवर एम्बेड केलेले असतात. बोस-ट्यून केलेल्या ऑडिओसह विकसित केलेले हे ओपन-स्टाईल इअरबड्स spatial sound ला समर्थन देतात आणि 37 तासांपर्यंत प्लेबॅक देतात. हे इअरबड्स दागिन्यांसारखे घालण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. यापूर्वी, मोटोरोलाने एप्रिलमध्ये फ्रेंच ओक फिनिशमध्ये ते लाँच केले होते, ज्यामध्ये एम्बेडेड स्वारोवस्की क्रिस्टल्स देखील होते.
Motorola Razr 60 आणि Moto Buds Loop 7 ऑगस्टपासून Motorola.com आणि निवडक किरकोळ विक्रेत्यांद्वारे उपलब्ध होईल. ब्रँडच्या माहितीनुसार ते जागतिक स्तरावरील बहुतेक बाजारपेठांमध्ये उपलब्ध असेल, परंतु भारतासह इतर भागांसाठी किंमत आणि इतर माहिती अद्याप जाहीर केलेली नाही.
जाहिरात
जाहिरात