Motorola Edge 60 भारतात 25,999 रुपयांमध्ये लॉन्च; पहा काय आहेत फीचर्स

Motorola Edge 60 मध्ये MediaTek Dimensity 7400 chipset चा समावेश आहे.

Motorola Edge 60 भारतात 25,999 रुपयांमध्ये लॉन्च; पहा काय आहेत फीचर्स

Photo Credit: Motorola

मोटोरोला एज ६० पँटोन जिब्राल्टर सी आणि पँटोन शेमरॉक शेड्समध्ये येतो

महत्वाचे मुद्दे
  • Motorola Edge 60 मध्ये 5,500 mAh battery आहे, ज्याला बॉक्समध्ये 68 W चा
  • फोन Gibraltar Sea (smoky blue) आणि Shamrock (fresh green) रंगांमध्ये उपल
  • 17 जूनला दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्ट, मोटोरोला आणि भारतातील आघाडीच्
जाहिरात

Motorola कडून नुकताच Edge 60 smartphone भारतामध्ये लॉन्च करण्यात आला आहे. नवा Motorola Edge 60 हा Edge 60 family मध्ये आलेला लेटेस्ट फोन आहे. यामध्ये पूर्वी Edge 60 Pro, Edge 60 Stylus आणि Edge 60 Fusion चा समावेश आहे. या मिड सेगमेंट फोनमध्ये MIL-STD-810H मिलिटरी-ग्रेड सर्टिफिकेशन, IP68 + IP69 वॉटर आणि डस्ट प्रोटेक्शन आणि त्याच्या quad-curved display वर Gorilla Glass 7i आहे. Motorola Edge 60 मध्ये 6.7 inch 1.5K Super HD quad-curved pOLED display आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120 Hz आणि 4,500 nits peak brightness आहे.Motorola Edge 60 मध्ये 5,500 mAh battery आहे, ज्याला बॉक्समध्ये 68 W चार्जरचा सपोर्ट आहे. यात Dolby Atmos आणि Hi-Res Audio सह स्टीरिओ स्पीकर्स आहेत. Motorola Edge 60 हा 12 जीबी LPDDR4X RAM आणि 256GB UFS 2.2 storage सह MediaTek Dimensity 7400 chipset वर चालतो. हा Android 15 वर आधारित Hello UI वर चालतो.

Motorola Edge 60 मध्ये 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड + मॅक्रो लेन्स आणि 3x ऑप्टिकल आणि 30x पर्यंत डिजिटल झूमसह 10 मेगापिक्सेलचा टेलिफोटो लेन्स आहे. यात 50 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे. फोन सर्व कॅमेऱ्यांवर 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग देतो. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, 4G, Wi-Fi, Bluetooth 5.4, GPS आणि USB Type-C port चा समावेश आहे.

Motorola Edge 60 चे रंग, किंमत

Motorola Edge 60 हा पँटोन प्रमाणित Gibraltar Sea (smoky blue) आणि Shamrock (fresh green) रंगांमध्ये येतो. 17 जूनला दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्ट, मोटोरोला आणि भारतातील आघाडीच्या रिटेल स्टोअर्सवर 12GB + 256GB RAM and storage configuration या एकमेव कॉन्फ्युगरेशनचा फोन 25,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध होईल. Motorola ने 23,999 रूपयांमध्ये नवीन Pantone Mykonos Blue finish Edge 60 फ्यूजन देखील लाँच केले. 13 जूनपासून फ्लिपकार्ट, मोटोरोला आणि भारतातील आघाडीच्या रिटेल स्टोअर्सवर त्याची विक्री होईल.

Motorola Edge 60 चा आकार 161.2×73.08×8.25mm आहे तर फोनचं वजन 181 ग्राम आहे.

Comments
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »