Motorola Edge 60 Fusion च्या अपडेट्स बद्दल समोर नवे लीक्स; घ्या जाणून

Motorola Edge 60 Fusion मध्ये 50-megapixel Sony LYTIA sensor ज्याला optical image stabilisation सपोर्ट असेल असा अंदाज आहे.

Motorola Edge 60 Fusion च्या अपडेट्स बद्दल समोर नवे लीक्स; घ्या जाणून

Photo Credit: Motorola

मोटोरोला एज ६० फ्यूजन एज ५० फ्यूजनला यशस्वी करेल अशी अपेक्षा आहे.

महत्वाचे मुद्दे
  • Motorola Edge 60 series लवकरच लॉन्च होण्याच्या तयारीत
  • Motorola Edge 60 series मध्ये असणार Quad-Curved Display
  • हॅन्डसेट 8GB RAM, 256GB onboard storageला सपोर्ट करण्याचा अंदाज
जाहिरात

Motorola Edge 60 Fusion आहे. हा फोन Motorola Edge 50 Fusion च्या पुढील फोन आहे. जो मे 2024 मध्ये आला होता. सध्या फोनचे पुढील अपडेट्स मिळण्याआधी ऑनलाईन या फोनचे डिझाईन आणि रंगांचे पर्याय समोर आले आहेत. Motorola India कडून new Edge series phone ची झलक दिली आहे. यापूर्वी फोनच्या रंग, प्राईज सोबत Edge 60 series च्या व्हेरिएंट्सची माहिती देण्यात आली होती.

Motorola Edge 60 Fusion ची भारतातील लॉन्च अपडेट

प्रमोशनल व्हिडीओ च्या माहितीनुसार, फोनच्या नावांची स्पष्टता नाही पण टॅगलाईन ही "Experience the Edge, Live the Fusion" अशी आहे. त्यामुळे हे फोन Edge 60 Fusion असल्याचे संकेत मिळतात. टीझरच्या माहितीनुसार, ते फ्लिपकार्ट वर उपलब्ध असतील असेही समोर आले आहे. व्हिडिओ मध्ये अन्य कोणतेही लॉन्च बाबातचे अपडेट्स समोर आलेले नाहीत.

Motorola Edge 60 Fusion चे डिझाईन, रंग

Motorola Edge 60 Fusion च्या लीक झालेल्या रेंडर मध्ये tipster Evan Blass (@evleaks) ने X post वर दिलेल्या माहितीनुसार, फोनचं डिझाईन हे पूर्वीच्या फोनच्या डिझाईन सारखेच असणार आहे. dual rear camera unit,ऐवजी Edge 60 Fusion मध्ये triple rear camera setup असणार आहे. कॅमेरा आयलंड हे चौकोनी असेल.

rear camera units वर कोरलेल्या माहितीनुसार, Motorola Edge 60 Fusion मध्ये 50-megapixel Sony LYTIA sensor आहे. ज्याला optical image stabilisation सपोर्ट आहे. फोनचा quad curved display हा very slim bezels,सह आहे तर पूर्वीपेक्षा थोडा पातळ आणि वरच्या बाजूला centred hole-punch slot आहे.

Motorola Edge 60 Fusion च्या लीक झालेल्या माहितीनुसार, फोन light blue, salmon (light pink), आणि lavender (light purple) रंगांमध्ये उपलब्ध आहे. यापूर्वीच्या लीक्सनुसार, फोन निळा आणि ग्रे रंगामध्ये उपलब्ध असेल. युरोपात काही निवडक मार्केट्स मध्ये फोनची किंमत 350 युरो म्हणजे अंदाजे 33,100 रूपये असू शकते. त्याचे स्टोरेज कॉन्फ्युगरेशन 8GB + 256GB RAM आणि storage आहे.

Motorola Edge 60 Fusion बद्दल अजून माहिती समोर आलेली नाही. Edge 50 Fusion भारतामध्ये लॉन्च झाला तेव्हा त्याची किंमत 8GB + 128GB आणि 8GB + 256GB variants साठी Rs. 22,999 आणि Rs. 24,999 होती.

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. OnePlus Nord Buds 4 Pro भारतात १९ मार्चला लॉन्च होणार
  2. Samsung Galaxy M17 5G भारतात लॉन्च; ५०MP कॅमेरा आणि ५,०००mAh बॅटरीसह दमदार फीचर्स
  3. WhatsApp अपडेट: इमोजी टाइप करताच मिळणार संबंधित स्टिकर्स, iPhone युजर्ससाठी नवीन फीचर
  4. वनप्लस 15T चे डिझाइन आणि रंग पर्याय अधिकृतपणे जाहीर; चीन लॉन्चपूर्वी फीचर्स समोर
  5. iQOO Z11 Turbo चा टीझर समोर; लवकरच लॉन्च, जबरदस्त बॅटरी आणि फास्ट चार्जिंगची शक्यता
  6. SIM Binding नियम काय आहे? मेसेजिंग अॅप्स आणि वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार
  7. Poco C85x 5G लवकरच भारतात; Flipkart मायक्रोसाइटवर डिझाइनची झलक
  8. Google Pixel 10a भारतात विक्रीसाठी उपलब्ध; 48MP कॅमेरा, 5100mAh बॅटरीसह किंमत ₹49,999
  9. Motorola Edge 70 Fusion किंमत आणि उपलब्धता
  10. Nothing Phone 4a सीरिज भारतात लॉन्च; किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाहीर
© Copyright Red Pixels Ventures Limited 2026. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »